गुजरातमध्ये मोठा राजकीय भूकंप ? मुख्यमंत्र्यांनी दिला तडकाफडकी राजीनामा : वाचा सविस्तर

गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या राजीनाम्याचं नेमकं कारण समजू शकले नाही. मात्र रुपाणी यांच्या राजीनाम्याने गुजरातच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ माजली आहे. रुपाणी यांनी आजारपणाच्या कारणामुळे राजीनामा दिल्याचं सांगितलं जातं. मात्र त्यांच्या म्हणण्याला अद्याप कुणीही दुजोरा दिला नाही त्यामुळे त्यांच्या राजीनाम्याचं नेमकं कारण समजू शकलं नाही.

मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी थोड्या वेळापूर्वीच पत्रकार परिषद घेऊन आपण पदाचा राजीनामा देत असल्याचं जाहीर केलं. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांचे त्यांनी संधी दिल्याबद्दल आभार मानले. विजय रुपाणी पत्रकार परिषदेआधी राज्यपालांना भेटले. राज्यपालांकडे राजीनामा दिल्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन त्याबाबतची घोषणा केली.

गुजरातमध्ये पुढील वर्षी विधानसभा निवडणुका होत आहे. गुजरातमधील पटेल समाज भाजपवर नाराज आहे. त्यामुळे पटेल समाजाची नाराजी दूर करण्यासाठी भाजपने व्यूवहरचना आखली आहे. त्याचाच एक भाग म्हणून रुपाणी यांचा राजीनामा घेण्यात आला असून त्यांच्या जागी पटेल समाजातून मुख्यमंत्री देण्याचा भाजपचा प्रयत्न असल्याचं सांगितलं जात आहे.

विजय रुपाणी कोण आहेत ?

  • विजय रुपाणी यांनी गुजरातचे मुख्यमंत्रिपद भूषवलं असून सध्या ते सध्या 65 वर्षांचे आहेत
  • 7 ऑगस्ट 2016 रोजी त्यांनी गुजरातच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्या जवळचे विजय रुपाणी मानले जातात
  • आनंदीबेन पटेल यांच्या मंत्रिमंडळात त्यांनी वाहतूक, पाणीपुरवठा, कामगार तसेच रोजगार अशी मंत्रिपदं भूषवली आहेत
  • गुजरातमध्ये अनेक वर्षे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे काम त्यांनी पाहिलं.
  • विजय रुपाणी यांनी 2006 ते 2012 या काळात राज्यसभा खासदार म्हणूनही काम पाहिलं