केतकी चितळेला मोठा धक्का , ‘ ते ‘ प्रकरण अंगलट येणार : काय आहे प्रकरण ?

अभिनेत्री केतकी चितळे आणि विवाद हे समीकरण आता नवं नाही. अनेकदा वादग्रस्त वक्तव्यांमुळे ती चर्चेत राहते तर अनेकदा तिच्या सोशल मीडिया पोस्टही अनेक वेळा वाद निर्माण करतात . कदाचित चर्चेत राहण्यासाठीच ती अशी व्यक्तव्ये करते,अशी देखील टीका तिच्यावर केली जाते . असेच एक प्रकरण आता तिच्या अंगलट आले असून यावेळी ती केवळ वादग्रस्त विधानांत अडकली नाही तर तिच्यावर गुन्हाही नोंदवण्यात आला आहे.

गेल्या वर्षी मार्च महिन्यातच हे प्रकरण सुरू झालं होतं. त्यावेळी केतकीने एक वादग्रस्त पोस्ट टाकली आणि त्यानंतर तिच्यावर गुन्हा नोंदवला गेला . ठाणे कोर्टाने या गुन्ह्याबद्दल निर्णय देताना तिचा अटकपूर्व जामीन फेटाळला आहे. त्यामुळे आता केतकी चितळेच्या अडचणीत वाढ झाली आहे. केतकी चितळे हिने 1 मार्च 2020 रोजी आक्षेपार्ह पोस्ट सोशल मीडियावर पोस्ट केली होती. ज्यामुळे तिच्यावर टीकाही झाली होती मात्र तिने देखील टीका करणाऱ्यांना कधी जुमानले नाही.

3 मार्च 2020 रोजी वकील स्वप्नील जगताप यांनी नवी मुंबई येथील रबाळे पोलिस ठाण्यात केतकी चितळे व सुरज शिंदे विरुद्ध जाती व जमाती अत्याचार प्रतिबंध कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर केतकीने अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला होता. मात्र कोर्टाने आता केतकीचा अर्ज फेटाळला आहे. ठाणे कोर्टाने केतकीला हा मोठा धक्का दिला असून आता केतकीच्या अडचणी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

काय होत नेमकं प्रकरण ?

1 मार्च 2020 रोजी केतकीने रात्री फेसबुकवर एक पोस्ट टाकली होती. यात तिने “नवबौद्ध, ६ डिसेंबरला फुकट मुंबई दर्शनास येतात, तो धर्म विकासासाठीचा हक्क. आम्ही फक्त हिंदू, असा शब्द उद्गारला, तर घोर पापी, कट्टरवादी!? पण अर्थात चूक कुणा दुसऱ्यांची नाही, तर आमचीच आहे. आम्ही स्वतःच्यातच भांडण्यात इतके बिझी आहोत, आम्हाला आमच्यातच फूट पाडणारे नेते आवडतात आणि आम्ही त्यांना ती फूट पाडू देतो, की स्वतःचा धर्म आम्ही विसरतो,” असे लिहिले होते.