यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ संलग्नित पत्रकारिता डिग्री अभ्यासक्रमाचा अंतिम वर्षाचा निकाल जाहीर

शेअर करा

अकोले प्रतिनिधी ललित मुतडक:-यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ संलग्नित पत्रकारिता डिग्री अभ्यासक्रमाचा अंतिम वर्षाचा निकाल नुकताच जाहीर झाला. पहिल्याच बॅचचा निकाल ८४ टक्के इतका लागला. प्राजक्ता सोलापुरे यांनी ८२ टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळविला. मनीषा गडाख यांनी ८०.७५ टक्के गुण मिळवून द्वितीय तर कुसुम वाकचौरे यांनी ८०.३८ टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळविला.

संस्थेचे अध्यक्ष मधुकरराव नवले यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना लोकशाहीचा महत्त्वाचा स्तंभ असलेल्या पत्रकारिता क्षेत्रात कारकीर्द करण्यास इच्छुक असणार्‍या विद्यार्थ्यांकरिता यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र विद्यापीठ यांच्याशी संलग्नित बीए इन जर्नालिझम ऍण्ड मास कम्युनिकेशन हा तीन वर्षांचा अभ्यासक्रम राबविण्यासाठी अभिनव शिक्षण संस्थेच्या अभिनव कॉलेज ऑफ सायन्स अंतर्गत अभ्यासकेंद्र उपलब्ध करून दिले. या क्षेत्रात आपली कारकीर्द घडवू पाहणाऱ्या विद्यार्थ्यांनी उत्तम प्रतिसाद देत प्रथम बॅच पूर्ण क्षमतेने प्रवेशित झाली. या अभ्यासक्रमाचे अभिनव मधले हे तिसरे वर्ष आहे. विशेष म्हणजे अहमदनगर जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून विद्यार्थी या अभ्यासक्रमास प्रवेश घेताना दिसत आहेत.

प्रथम बॅचच्या यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष नवले, उपाध्यक्ष सुरेश कोते, सचिव प्राचार्य रमेशचंद्र खांडगे, खजिनदार भाऊसाहेब नाईकवाडी, सर्व विश्वस्त मंडळ, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे रिजनल डायरेक्टर डॉ धनंजय माने, जनसंपर्क अधिकारी संतोष साबळे तसेच प्राचार्य मिलिंद आरोटे , प्रा अनिल बेंद्रे , केंद्र संयोजक प्रा. रोहिणी गुंजाळ तसेच सर्व विभागाचे प्राचार्य विभागप्रमुख यांनी अभिनंदन केले.


शेअर करा