प्रियकर भेटताच आईमधील ‘ बदल ‘ अल्पवयीन मुलाच्या लक्षात आला आणि त्यानंतर..

आईसारखे दुसरे जवळचे मुलांना कोणीच नसते असे म्हटले जाते मात्र तामिळनाडूमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आले असून चाईल्डलाईनच्या मदतीने हा सर्व प्रकार उघडकीस आला आहे . कुड्डालोर जिल्ह्यातील एका गावात आईवर तिच्या प्रियकरासोबत मिळून आपल्या 12 वर्षांच्या मुलावर गरम लोखंडाच्या पाईपने हल्ला केल्याचा आरोप आहे. शेजारील एका व्यक्तीने हा प्रकार पाहिल्यानंतर याबाबत चाइल्डलाइनला माहिती दिली आणि त्यानंतर पुढील कारवाई करण्यात आली.

उपलब्ध माहितीनुसार, प्रियकराच्या नादी लागताच आईच्या वागण्यातील बदल त्याच्या लक्षात आला आणि त्याने आईला याबद्दल जाब विचारला असता आईचा प्रियकर आणि आई यांनी मिळून पीडित मुलास लोखंडी पाईपने मारहाण केली. आईचे वय हे ३५ वर्षे असून असून तिचे नाव शांतीदेवी आहे तर तिच्या प्रियकराचे वय ४० वर्षे असून त्याचे नाव एम धुगेयाल अहमद असल्याचे समजते .दोघांनी मिळून मुलाला मारहाण केल्याचे समजताच चाइल्डलाइन आणि पोलिसांची टीम घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी दोन्ही आरोपींना ताब्यात घेतलं.

दोन वर्षांपूर्वी शांतीचे पती हरिकृष्णन यांचं कर्करोगामुळे निधन झालं होतं. त्यानंतर ती तथाकथित भोंदू बाबा धुगेलाल अहमदच्या संपर्कात आली. धुगेलालने सांगितलं की, महिलेच्या घरात वाईट शक्ती वास करीत आहेत. त्यानंतर आरोपीने पीडित महिलेस आपल्या जाळ्यात ओढले आणि त्यानंतर घरातील आर्थिक समस्या दूर करण्यासाठी त्याने घरात काही पूजा विधी करण्याची गरज आहे असे सांगितले. त्यानंतर सातत्याने ते एकमेकांच्या जवळ येत गेले आणि लहान मुलासाठी ते अडचणीचे ठरू लागले.

आरोपी महिलेच्या अल्पवयीन मुलाने आईच्या वागण्यात झालेला बदल पाहिला होता. त्याने अहमदसोबत तिच्या असलेल्या संबंधांवर सवाल उपस्थित केले. यामुळे नाराज महिला आणि अहमदने मुलाला त्रास द्यायला सुरुवात केली. एकेदिवशी त्यांनी मुलाला रात्रभर घराबाहेर ठेवलं होतं. शेजारील व्यक्तींच्या लक्षात हा प्रकार आला होता मात्र ते अहमदला घाबरून होते मात्र अखेर एका स्थानिकाने याबाबत ग्राम प्रशासकीय अधिकारी आणि चाइल्डलाइनला यांना माहिती दिली आणि हा प्रकार उघडकीस आला.