पुण्यात पूजा सांगणारा गुरुजीच निघाला घरफोडीचा ‘ मास्टरमाईंड ‘ , चोरीच्या पद्धतीने पोलिसही हैराण

शेअर करा

पौराहित्य करणाऱ्या गुरुजीनेच महिला साथीदारांच्या मदतीने पुण्यात वारजेसह, उत्तमनगर आणि आळंदी येथे पाच घरफोड्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. वारजे पोलिसांनी या गुरुजीसह त्याच्या दोन महिला साथीदारांना अटक केली आहे. त्यांच्याकडून अर्धा किलो सोने, चांदी आणि रोख रक्कम असा ३३ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून आरोपींच्या कामाची पद्धत देखील एकदम वेगळी होती.

उपलब्ध माहितीनुसार, आरोपी पद्माकर जोशी हा पौराहित्य करत असताना तो अनेकांच्या घरी, दुकानात किंवा कार्यालयात जात असायचा त्यावेळी तो त्या ठिकाणी रेकी करायचा तसेच गप्पा मारतानाही आवश्यक ती माहिती मिळवायचा मात्र त्यानंतर दुसऱ्या आरोपी अर्चना खाडे आणि नीलिमा जोशी या घर भाड्याने घ्यायच्या बहाण्याने पुन्हा चौकशीसाठी जात असत आणि संबंधित इमारतीत सुरक्षा आहे किंवा नाही ? तसेच आसपासच्या परिसराची माहिती या दोघी घ्यायच्या आणि त्यानंतर तिघे मिळून घरफोडीचे लोकेशन फायनल करत असत.

वारजे परिसरातील एका दांम्पत्याच्या घरात चोरी झाली होती त्याचा तपास करताना तपास अधिकारी व उपनिरीक्षक नरेंद्र मुंढे, पोलिस नाईक अमोल राऊत आणि गोविंद फड यांनी मिळालेल्या माहितीच्या आधारे आरोपीचा शोध असता पद्माकर भगवानराव जोशी (वय ४६, रा. धायरी) याला ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली आणि त्याने त्याच्या साथीदार महिला अर्चना सुधीर खाडे (वय ४०, रा. आळंदी) आणि नीलिमा नितीन जोशी (वय ४४, रा. आळंदी) यांनी आतापर्यंत किमान पाच घरफोड्या केल्याचे आढळून आले आहे. वरिष्ठ निरीक्षक शंकर खटके, उपनिरीक्षक नरेंद्र मुंढे, मनोज बागल, पोलिस नाईक गोविंद फड, अमोल राऊत, अमोल काटकर, पोलिस शिपाई बाळू शिरसाठ, रमेश चव्हाण, अजय कामठे, नितीन कातुर्डे आणि विजय भुरूक यांनी ही कारवाई केली आहे.


शेअर करा