याहू कंपनीचा भारताला ‘ अखेरचा दंडवत ? ‘, मोठी घोषणा करत सांगितले खरे कारण

भाजप सत्तेत आल्यापासून प्रसारमाध्यमांची गळचेपी सुरु असून स्वतंत्र पत्रकार तसेच विविध माध्यमसमूहांना सरकारकडून अनेक पद्धतीने त्रास देणे सुरु असून चौकश्या मागे लावणे , संपादकांना स्वतंत्र लिहण्यापासून त्यांची गळचेपी करणे असे प्रकार सुरु आहेत. प्रकरण कोर्टात गेल्यावर यातून बहुतांश प्रकरणात सरकारला बॅकफूटवर जावे लागल्याचे पहायला मिळालेले आहे मात्र त्यातून देशातील प्रसार माध्यमे भरडून निघाली आहेत . देशातील माध्यमांवर अशी बंधने येत असतानाच आता कन्टेन्ट आणि बातम्या देणाऱ्या याहू कंपनीने देखील दिनांक २६ ऑगस्ट २०२१ पासून बातम्या देणे बंद केले असून आपल्या होमपेजवर याबद्दल घोषणा केली आहे .

याहूने म्हटले आहे की, ‘ दिनांक २६ ऑगस्ट २०२१ पासून आम्ही भारतातील बातम्या , क्रिकेटच्या बातम्या, आर्थिक घडामोडी, करमणूक याबद्दलच्या बातम्या बंद करत आहोत. सरकारच्या नवीन निर्बंधामुळे आमच्या काम करण्यावर बंधने येत असून त्यानंतर विचारपूर्वक डिजिटल कन्टेन्ट प्रसिद्ध करण्यासाठी अडचणी येत असल्याने निर्णय घेण्यात आला आहे .याहूचे आणि भारताचे गेल्या २० वर्षांपासून चांगले नाते राहिलेले आहे. गेल्या २० वर्षांपासून आपण दिलेल्या प्रेमाबद्दल धन्यवाद ‘

याहूने क्रिकेट संदर्भात देखील वृत्त देणे बंद केले असून , क्रिकेट संदर्भातील बातम्या ह्या देखील बातम्या कॅटेगरी मध्ये येत असल्याने बंद करण्यात येत असल्याचे जाहीर केले आहे तसेच पुन्हा बातम्या सुरु करणार का ? यावर देखील इतर पर्याय आल्यास पुन्हा भारतीयांसाठी सेवा देणार असल्याचे देखील सुतोवच केले आहे.

याहू ई-मेल आणि सर्च बंद होणार का ?

सरकारच्या नवीन एफडीआय नियमाच्या अंतर्गत याहू सर्च आणि ईमेल येत नसल्याने या दोन्ही सेवा पूर्ववत सुरु राहणार आहेत तसेच यामुळे आपल्या ग्राहकांचा याहू ई-मेल देखील बदलणार नाही, असे देखील म्हटले आहे .