महाराष्ट्र हादरला..’ त्या ‘ धक्कादायक घटनेत जावयाने सासूवर अत्याचार केल्याचे उघडकीस

दहा दिवसांपूर्वी एका वृद्ध महिलेच्या खुनाची घटना उघडकीस आल्यानंतर पोलीस आरोपीचा कसून शोध घेत होते. ही घटना मुंबईतील विलेपार्ले इथे उघडकीस आली होती. संतापलेल्या जावयाने हा खून केल्याचे उघडकीस आले असून जावयानेच सासूवर अनैसर्गिक अत्याचार केल्याचे उघड झाले आहे. खुनाच्या या गुन्ह्यांत आता पोलिसांनी ३७७ कलमाची वाढ केली केली असून आरोपी असलेल्या जावयाच्या पोलीस कोठडीत १४ सप्टेंबरपर्यंत वाढ करण्यात आली आहे.

उपलब्ध माहितीनुसार, २ सप्टेंबर विलेपार्ले येथे एका ६१ वर्षांच्या महिलेची हत्या झाली होती. हत्या झाल्यावर काही वेळातच ही हत्या जावयाने केल्याचे उघडकीस आले होते. हत्येचा गुन्हा नोंद होताच पळून गेलेल्या आरोपी जावयाला नंतर विलेपार्ले पोलिसांनी लगेच अटक केली होती. सदर आरोपी हा रेकॉर्डवरचा गुन्हेगार असून मयत महिलेचा शवविच्छेदन अहवाल पोलिसांना प्राप्त होताच त्यात तिच्या गुप्त भागावर दुखापत असल्याचे आढळून आले होते. गुन्हेगार जावयाने त्याच्या सासूच्या गुप्त भागावर बांबूद्वारे अनैसर्गिक अत्याचार केल्याचे तपासात पुढे आले आहे.

मयत महिलेची मुलगी आरोपीची पत्नी होती तर आरोपीविरुद्ध २८ हून अधिक गुन्ह्यांची नोंद होती. हत्येच्या दोन दिवसांपूर्वीच तो जेलमधून बाहेर आला होता. यावेळी त्याला त्याच्या पत्नीने दुसरा विवाह केल्याचे समजले. ती तिच्या दुसर्‍या पतीसोबत घरातून निघून गेली होती. तिचा पत्ता तिच्या आईला म्हणजेच सासूला माहित होता मात्र ती आरोपीला तो पत्ता देत नसल्याने त्यांच्यात वाद झाला आणि नंतर त्याने तिची हत्या केली आणि तिच्यावर अनैसर्गिक अत्याचार केला .

सासूची हत्या करुन जावयाने जवळच असलेल्या सत्कार बार ऍण्ड रेस्ट्रॉरंटमध्ये मॅनेजरकडे पैशांची मागणी केली. त्याच्या धमकीनंतर मालकाने त्याला तीन हजार आणि दोन दारुच्या बाटल्या दिल्या होत्या. तो तेथून निघून गेल्यानंतर त्याने त्याच्याच सासूची हत्या केल्याचे त्यांना समजले होते. त्यानंतर त्याने ही माहिती विलेपार्ले पोलिसांना दिली होती. आरोपीविरुद्ध हत्येनंतर खंडणीचा दुसरा गुन्हा देखील नोंदविण्यात आला आहे .