पाथर्डी येथे कृषिदूत वैभव गाडे यांचेकडून शेतकऱ्यांना मार्गदर्शन

पाथर्डी प्रतिनिधी: पाथर्डी येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत कृषी महाविद्यालय बाभूळगाव तालुका येवला येथील कृषी अभ्यासाची कृषी जागरूकता आणि कृषी भौगोलिक कार्यानुभव कार्यक्रम निमित्ताने कृषीदूत वैभव दिगंबर गाडे यांनी शेतकऱ्यांना नुकतेच मार्गदर्शन केले. या कार्यक्रमांतर्गत शेतकऱ्यांना येणाऱ्या समस्या आणि त्यावरील उपाय, शेतकऱ्यांमध्ये तंत्रज्ञानाच्या बाबतीत असलेले गैरसमज, सेंद्रिय शेती, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आधुनिक शेती, जलसिंचन पशुधन आणि कृषी विषयक सरकारी विविध योजनांची माहिती यावेळी वैभव गाडे यांनी दिली.

मातीपरीक्षण, एकात्मिक किडा नियंत्रण, फळबाग लागवड, प्रक्रिया उद्योग, जनावरांचे संगोपन व व्यवस्थापन, पीक कर्ज, खत व पाणी नियोजन व्यवस्थापन, नवनवीन शेतीविषयक सुधारित माहिती या विषयी खूप मौलिक अशी माहिती दिली.यासाठी कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी.पी. कुलधर, उपप्राचार्य डॉ. एस. डी. म्हस्के, डॉ. एस. एस. साळुंके, प्रा.ए. आर. कोळगे, प्रा. जे. एस. राठोड आदींचे मार्गदर्शन लाभले.