.. अन्यथा नगरच्या मनपा आयुक्तांना मैल मिश्रित पाण्याने घालणार आंघोळ घालणार, वंचितचा इशारा

अहमदनगर : नगर शहरातील महात्मा फुले घरकुल वसाहत काटवन खंडोबा येथील रहिवाश्यांना हक्काच्या नागरी सोयी उपलब्ध करून न दिल्यास मनपा आयुक्तांना मैल मिश्रित पाण्याने घालणार आंघोळ घालण्यात येईल, असा इशारा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने देण्यात आला आहे .

झोपडपट्टीतील कुटुंबाला चांगल राहाता याव म्हणुन शासनाने पुढाकार घेऊन घरकुल योजना अंमलात आणली आणि त्या प्रमाणे कोठी येथील झोपडपट्टीतील अनेक परिवाराला काटवन खंडोबा येथे महात्मा फुले वसाहत या ठिकाणी घरकुल दिले पण तिथं वेळोवेळी साफसफाई व ईतर जबाबदाऱ्या या म.न.पा च्या आहेत हे बहुदा पलिका प्रशासन विसरलं असावं या ठिकाणी नाला साफसफाई होत नाहीत,मैल मिश्रित पाणी पिण्यासाठी येते,सेफ्टी टँक नाहीत,शौचालयाची सर्व घाण शेजारच्या मोकळ्या जागेत सोडलेले आहे. त्याची दुर्गंधी पसरल्यामुळे तेथील रहिवाश्यांना राहणं मुश्किल झालं आहे .

अहमदनगर महानगरपालिका हद्दी मधील साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे वस्ती सुधार योजने चा जो निधी प्राप्त पालिकेला होतो त्याचा विनियोग योग्य पद्धतीने झालेला नाही.तत्कालीन त्या त्या काळातील महापौर यांनी पालिकेतील असक्षम अधिकाऱ्यांना हाताशी धरून साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे वस्ती सुधार योजनेचा फायदा हा ज्या वंचित घटकांना झाला पाहिजे होता तो झालेला दिसून येत नाही, यासाठी वंचितच्या वतीने इशारा देण्यात आला आहे . यासाठी मनपाला इशारा देण्यात आला आहे .

निवेदन मिळाल्यापासून दि.१८/०९/२०२१ पर्यंत जर हि कामे झाली नाही तर दि . २१/०९/२०२१ ला मैलामिश्रित पाण्याने अहमदनगर म.न.पा च्या आयुक्तांना अंघोळ घालण्याचे आंदोलन वंचित बहुजन आघाडीकडून करण्यात येणार आहे .निवेदन सादर करते वेळी प्रतिक बारसे जिल्हाध्यक्ष,योगेश साठे महासचिव,फिरोज पठाण संघटक,स्तुती सरोदे,शीतल शिराळे,विशाल साबळे युवा महासचिव,संजय जगताप शहर अध्यक्ष,भाऊ साळवे कार्याध्यक्ष,प्रवीण ओरे शहर उपाध्यक्ष,नयन आल्हाट,सचिन पवार आदीसह काटवण खंडोबा परिसरातील रहिवासी उपस्थित होते.