खोटी कागदपत्रे दाखवून अल्पवयीन प्रेमी युगुल हॉटेलमध्ये आले मात्र अचानक ‘ झाले असे ‘ की ..

देशात रोज नवीन नवीन धक्कादायक घटना उघडकीस येत असतात . अशीच एक घटना आता मध्य प्रदेशातील उज्जैन इथे उघडकीस आली आहे . उज्जैन इथे एका अल्पवयीन मुलीने हॉटेलच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली असून सदर प्रकरणात तिच्यासोबत असलेला तिचा प्रियकर व हॉटेलचा व्यवस्थापक यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे . सोमवारी रात्री संबंधित अल्पवयीन तरुणी तिच्या अल्पवयीन प्रियकरासोबत तिथे मुक्कामाला आली होती.

काय आहे प्रकरण ?

संबंधित अल्पवयीन मुलीने तिच्या अल्पवयीन प्रियकरासह सोमवारी उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिराजवळ असलेल्या एका हॉटेलमध्ये चेक-इन केले. चेक इन करतेवेळी किशोरवयीन मुलगी आणि मुलाने एक चक्क विवाहित जोडपे म्हणून तिथे चेक इन केले . हॉटेल व्यवस्थापनाला त्यांनी बनावट ओळखपत्र दाखवले आणि प्रवेश मिळवला. आतमध्ये गेल्यानंतर त्यांच्यात सदर प्रियकर हा तिच्या चारित्र्यावर संशय घेत असल्याने वाद सुरु झाला. काही वेळ वाद झाल्यावर तिच्यासोबतच्या प्रियकराने त्याच्या एका दुसऱ्या अल्पवयीन मित्राला बोलावून घेतले , मात्र भांडणे मिटायचे नाव घेत नव्हती, त्यातून त्या मुलीने प्रियकराच्या समोरच खिडकीतून उडी मारली. त्याचा मित्र आणि तो प्रियकर हे नुसते बघतच राहिले .

आपली प्रेयसी आपल्या मित्रासोबतही रिलेशनशिपमध्ये असून ती आपल्याला फसवत आहे, असा संशय प्रियकराला होता. म्हणूनच त्याने आपल्या मित्रालाही सोमवारी हॉटेलमध्ये भेटायला बोलावले होते. त्या मित्राच्या उपस्थितीतच त्याने प्रेयसीला वारंवार तिच्या चारित्र्यावरून बडबड सुरु केली त्यातून तिचे देखील मानसिक संतुलन बिघडले. मित्राच्या समोरच त्याने तिला अनेकदा थप्पडही लगावली. तिचाही राग अनावर होऊन अखेर तिने हॉटेलच्या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरुन खाली उडी मारली.

घटना घडल्यानंतर अल्पवयीन मुलगा आणि हॉटेल व्यवस्थापकाविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बनावट कागदपत्रांच्या आधारे अल्पवयीन मुलांना मॅनेजरने हॉटेलमध्ये प्रवेश दिला म्हणून हॉटेल व्यवस्थापक यावर देखील गुन्हा दाखल झाला आहे.जेव्हा ही घटना घडली तेव्हा हॉटेलमध्ये बरेच लोक थांबले होते. अनेकांनी तरुणांना भांडताना पाहिले किंवा ऐकले असून त्यांचे जबाबही नोंदवले गेले आहेत, असे पोलिसांनी पुढे सांगितले तसेच प्रियकराच्या मित्राचा यात काही सहभाग असेल असे पोलिसांना वाटत नसल्याने त्याला सोडून देण्यात आले आहे .

दोन्ही अल्पवयीन मुलांच्या पालकांना त्यांनी हॉटेलमध्ये चेक इन केल्यापासून त्यांच्या ठावठिकाणाबद्दल माहिती नव्हती, असे देखील पोलीस म्हणाले आहेत . दोघांपैकी एकाच्याही पालकाने आपला पाल्य बेपत्ता असल्याची तक्रार देखील दाखल केलेली नव्हती. सध्या मुलीचा मृतदेह पोस्टमोर्टमसाठी पाठवण्यात आला असून तिला मारहाण करणाऱ्या त्या अल्पवयीन प्रियकराला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.