नगर महापालिकेच्या ‘ ह्या ‘ तीन विभागात घुसला कोरोना, रुग्णसंख्या हजाराच्या पुढे

शेअर करा

नगर जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या आज सकाळपर्यंत १०३५ झालेली आहे . आज नगर जिल्ह्यातील १७ रुग्णांनी कोरोनावर मात देखील केली आहे. त्यात महानगरपालिका क्षेत्रातील १५ आणि पारनेर तालुक्यातील ०२ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. जिल्ह्यामध्ये १२ मार्च रोजी पहिला करोना बाधित आढळला होता. तर, सोमवार, १३ जुलै म्हणजेच जवळपास चार महिन्यानंतर करोना रुग्णसंख्या ही एक हजाराच्या पुढे गेली आहे.

जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी कोरोना कालखंडादरम्यान दरम्यान सातत्याने परिस्थितीचा आढावा घेतला. त्यामुळे करोना नियंत्रणात ठेवण्यात प्रशासनाला यश आले . मात्र नगरमध्ये मुंबई, पुणे, औरंगाबाद, नाशिक अशा रेड झोनमधून येणाऱ्यांचे प्रमाण वाढल्यामुळे करोना बाधितांची संख्या वेगाने वाढू लागली. ३० जूनपर्यंत जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या ४६५ झाली होती. जुलै महिन्यात मात्र करोना प्रादुर्भाव वेगाने वाढू लागला असून यामुळे जिल्ह्यात बिकट परिस्थिती निर्माण झालेली आहे .

महापालिकेच्या आरोग्य,आस्थापना आणि नगररचना विभागात देखील कोरोना दाखल झालेला आहे . सध्या नगर शहरामध्ये तोफखाना, सिद्धार्थनगर, लक्ष्मीकारंजा, पद्मानगर, भिस्तबाग, बागरोजा हडको, नंदनवन कॉलनी (बुरुडगाव रोड) हे सात कंटेन्मेंट झोन आहेत. रुग्णसंख्येचा वाढता वेग पाहता संपूर्ण लॉकडाऊन बाबत सुद्धा प्रशासनाने विचार सुरू केला आहे.

अहमदनगरमधील सरकारी विश्रामगृह येथे आज भाजप महापौर बाबासाहेब वाकळे यांच्या उपस्थितीत ‘ जनता कर्फ्यू ‘ बाबत निर्णय घेण्यासाठी बैठक झाली. त्यावरून नगरमध्ये राजकारण चांगलेच पेटले आहे. भाजप राज्यात लॉकडाऊन बाबत गोंधळलेली दिसते आहे. पुण्यात लॉकडाऊनला विरोध तर नगरमध्ये पुढाकार असे एकंदरीत चित्र असल्याने केवळ विरोधासाठी विरोध असेच भाजपचे धोरण दिसते आहे .

नगरच्या महापालिकेत भाजप आणि राष्ट्रवादीची संयुक्त सत्ता आहे. महापौरपद भाजपकडे आहे. पुण्यासह अन्य ठिकाणी लॉकडाऊनचा निर्णय झाल्यानंतर आज नगरमध्येही त्यासाठी बैठक घेण्यात आली. महापौर बाबासाहेब वाकळे, आमदार संग्राम जगताप, आयुक्त श्रीकांत मायकलवार यांच्यासह पदाधिकारी आणि अधिकारी बैठकीला उपस्थित होते. १६ जुलैपासून लॉकडाऊन करण्यासंबंधी प्रस्ताव पाठविण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. याच बैठकीला नागरिकांच्या एका संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. त्यांनी या बैठकीची माहिती देणारा आणि नागरिकांनी पूर्व तयारी करून ठेवावी, असा मेसेज सदस्यांना दिला. मात्र, तो शहरात वेगाने व्हायरल झाला आहे . मात्र एकंदरीत परिस्थिती पाहता लॉकडाऊन शिवाय कोरोना आटोक्यात येण्याची चिन्हे कमीच दिसत आहेत .


शेअर करा