पुणे हादरले…पत्नीची ‘ तसली ‘ मागणी त्याला अखेर मृत्यूपर्यंत घेऊन गेली

सासरच्या छळाला कंटाळून सुनेने आत्महत्या केल्याच्या घटना रोज उघडकीस येत असतात मात्र पुणे इथे एक वेगळीच घटना उघडकीस आली असून पत्नी आणि सासुकडून सातत्यानं होणाऱ्या त्रासाला कंटाळून पुण्यातील एका तरुणाने आत्महत्या केली आहे. लग्न झाल्यापासून मागील पाच वर्षांपासून पत्नी आणि सासू संबंधित युवकाचा मानसिक त्रास देत होते. बायकोनं आणि सासूने केलेली शिवीगाळ अनेक दिवस हा तरुण सहन करत होता मात्र अखेर त्याचा संयम सुटला आणि त्याने आत्महत्या केली. लोणी स्टेशन येथील ही घटना घडली आहे.

उपलब्ध वृत्तानुसार , रोहित सुनिल पवार असं आत्महत्या करणाऱ्या युवकाचं नाव असून पुण्याजवळील लोणी स्टेशन परिसरातील तो रहिवासी होता. मृत रोहित यांचं नोव्हेंबर 2016 रोजी आरोपी युवतीशी विवाह झाला होता. लग्न झाल्यापासूनच आरोपी पत्नी आणि सासू रोहितला त्रास देऊ लागल्या होत्या. कुटुंबातून वेगळं राहण्यासाठी आरोपी पत्नी सतत रोहितशी भांडणं करत होती. पत्नी आणि सासूच्या त्रासाला कंटाळून 10 ऑगस्ट रोजी रोहितनं आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करत आकस्मिक मृत्यूची नोंद केली होती .

त्यानंतर मृत रोहितचे 56 वर्षीय वडील सुनिल रघुनाथ पवार यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात बायको आणि सासूविरोधात फिर्याद दाखल केली असून त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी बायको आणि सासूविरोधात कौटुंबीक हिंसाचारासह अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहे.