पुणे हादरले..पिंपरीत भर रस्त्यात डिलिव्हरी बॉयकडून आधी महिलेचा किस घेण्याचा प्रयत्न अन त्यानंतर..

राज्यभरात महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटनांत दिवसेंदिवस वाढ होत असताना सुशिक्षित समजले जाणाऱ्या पुण्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे .पिंपरी चिंचवडमध्ये फूड डिलिव्हरी कंपनीमध्ये काम करणाऱ्या एका डिलिव्हरी बॉयने महिलेची छेड काढल्याचा तसेच तिच्यासोबत भर रस्त्यात अश्लील वर्तन केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. वाकड पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही घटना घडली असून सदर आरोपी असा प्रकार करून तात्काळ तिथून फरार झाला आहे

उपलब्ध वृत्तानुसार, एका अज्ञात फूड डिलिव्हरी बॉयने एका महिलेची छेड काढून चक्क भर रस्त्यात तिला किस करण्याचा प्रयत्न केला. महिलेने त्याला फटकारले असताना त्याने तिला एका हाताने मिठी मारून अश्लील शेरेबाजी करत तिचा विनयभंग केला. 12 सप्टेंबर रोजी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास वाकडच्या सम्राट चौक या ठिकाणी ही धक्कादायक घटना घडली आहे.

वाकड – हिंजवडी सारख्या आयटी परिसरांमध्ये राहणाऱ्या महिलांना कामाच्या स्वरूपामुळे रात्री अपरात्री बाहेर वावरावे लागते त्यामुळे त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे . पोलीस रात्री गस्तीवर असताना देखील डिलिव्हरी बॉयने तक्रारदार महिलेचा अतिशय विकृतपणे विनयभंग केला आणि त्यानंतर तो फरार झाला. पोलीस या आरोपीचा शोध घेत असून अद्यापपर्यंत तरी तो पोलिसांच्या हाती आलेला नाही .