डीएसपीसोबत स्विमिंग टॅंक मध्ये ‘ आऊट ऑफ कंट्रोल ‘ महिला ताब्यात, आता म्हणतेय की ?

देशात नुकतीच एक धक्कादायक घटना उघडकीस आली होती. राजस्थान येथील जयपूरची ही घटना असून एक महिला कॉन्स्टेबल आपल्या सहा वर्षांच्या मुलासमोर पोलीस उपअधीक्षक अर्थात डीएसपींसोबत आंघोळ करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली होती. अश्लील व्हिडीओ शूट केल्याप्रकरणी निलंबित महिला कॉन्स्टेबलला देखील आता अटक करण्यात आली आहे. डीएसपीवर याआधीच गुन्हा नोंदवलेला असून त्यास देखील बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. सदर महिलेसोबत लहान मुलगा असताना देखील तिचे हे चाळे सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते. दंडाधिकाऱ्यांसमोर हजर केल्यानंतर तिला 17 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

काय आहे प्रकरण ?

महिला कॉन्स्टेबलसोबत स्विमिंग पूलमध्ये अश्लील चाळे करणाऱ्या राजस्थानच्या डीएसपीला उदयपूरमधील एका रिसॉर्टमधून अटक करण्यात आली होती . राजस्थानच्या स्पेशल ऑपरेशन ग्रूपनं रिसॉर्टवर छापा टाकला त्यावेळी डीएसपी आणि महिला कॉन्स्टेबल एका रिसॉर्टमधील स्विमिंग पूलमध्ये अश्लील चाळे करताना आढळून आले होते. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आधी डीपीसींना अटक करण्यात आली आणि त्यानंतर त्याला निलंबीत देखील करण्यात आले होती .

महिला कॉन्स्टेबलसोबत तिचा लहान मुलगा देखील असल्याने संबंधित महिला कॉन्स्टेबलला अटक करण्यात आली नव्हती. अश्लील व्हिडिओ सोशल मीडियात लीक झाल्यानंतर पोलीस प्रशासनात खळबळ उडाली होती. पोलीस खात्याची अशा कारनाम्यामुळे बदनामी होत असल्याने तात्काळ कारवाई करत पोलिसांनी गुरुवारी रात्री उशिरा रिसॉर्टवर छापा टाकून उदयपूर येथून डीएसपी हीरालाल यांना अटक करण्यात आली होती .

सदर व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर संबंधित महिला कॉन्स्टेबलचा पती पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी पोहोचला होता. पण डीएसपीच्या दबावामुळे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करुन घेण्यास नकार दिला गेल्याचा आरोप पतीनं केला आहे. त्यानंतर संबंधित पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनाही निलंबीत करण्यात आलं आहे तर व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या डीसीपींवरही निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

हिरालाल सैनी यांनी मात्र हा व्हिडीओ फेक असून एडीट करुन बनवल्याचा दावा केलाय. एवढच नाही तर व्हिडीओत दिसत असणारी महिला कोण आहे हे मी ओळखत नसल्याचही त्यांनी म्हटलंय. दुसरीकडे महिला कॉन्सटेबलनेही हा व्हिडीओ फेक असल्याचं म्हटले होत मात्र संबंधीत महिला कॉन्सटेबलनं 13 जुलै 2021 ला स्विमिंग पूलमधलेच काही फोटो आणि व्हिडीओ व्हॉटस अप स्टेटस म्हणून ठेवले होते, अशीही माहिती समोर आली आहे. सदर व्हिडिओत लहान मुलगा असल्याने या महिलेला पॉक्सो कायद्याच्या विविध कलमांखाली अटक करण्यात आली असून तिची चौकशी केली जात आहे.