अंधश्रद्धेचा कहर..पोटच्या मुलीची हत्या अन मांजरीला देखील सोडलं नाही अन नग्न होऊन महिला ..

अंधश्रद्धेचे प्रमाण हे भारत जरी जास्त असले तरी प्रगत समजले जाणारे देश देखील यातून सुटलेले नाहीत अशीच एक धक्कादायक घटना रशियातील मॉस्को इथे समोर आली असून विवाहबाह्य प्रेमातून प्रियकराच्या आहारी गेलेल्या या महिलेने सगळ्या मर्यादा पार केल्या . सदर महिलेने काळी जादू शिकण्यासाठी आपल्या पोटच्या मुलीचा बळी घेतला सोबतच घरातील मांजर देखील जिवंत सोडली नाही. स्वत:चा देखील जीव तिने यानंतर दिला. काळी जादू करुन बऱ्याच गोष्टी आपल्या हातात याव्यात यासाठी तिचा अट्टहास होता. रशियातील रोस्तोव-ऑन-डॉन या भागात ही घटना घडली असून मृतक महिलेचं नाव एलिझावेता त्सारेवस्काया आहे.

काय आहे प्रकरण ?

पतीच्या म्हणण्यानुसार, एलिझावेता त्सारेवस्काया हिचा प्रियकर हा स्वत:ला काळ्या जादूचा तज्ज्ञ समजायचा. त्यानेच महिलेला काळ्या जादूचं वेळ लावलं. सदर महिला ही आर्किटेक्ट आणि ड्रेस डिझायनर होती. ती एका ठिकाणी चांगल्या पगाराची नोकरी देखील करत होती , मात्र ती प्रियकराच्या संगतीत आली आणि त्यानंतर तिच्या वर्तनात बदल दिसू लागला. काळी जादू शिकण्याच्या मोहापायी तिने नोकरी सोडली. स्वत:ला काळ्या जादूचा तज्ज्ञ मानणाऱ्या एका व्यक्तीसोबत तिचे प्रेमसंबंध सुरु होते. त्यानेच तिला काळ्या जादूचे आणखी वेड लावले

पोलिसांनी मृतक महिलेच्या घराचा दरवाजा उघडला तेव्हा पोलिसांना धक्काच बसला. कारण घरात एलिझावेताचा नग्न मृतदेह तिच्या लहान मुलीच्या मृतदेहावर पडला होता. त्यांच्या जवळच घरातील मांजरीचा मृतदेह होता. तसेच त्यांच्या आजूबाजूला एका व्यक्तीची चित्रे विखुरलेली होती. पोलिसांनी संबंधित व्यक्ती नेमका कोण? ते जाणून घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा ती व्यक्ती हा मृतक महिलेचा प्रियकर असल्याची माहिती समोर आली. महिलेच्या पतीनेच ही माहिती दिली असून पतीने अनेकदा तिला या प्रियकरापासून बाजूला काढण्याचा प्रयत्न केला मात्र ती त्याच्या इतकी आहारी गेली होती की तिने पतीचे काहीच ऐकले नाही. शेवटी हतबल झालेल्या पतीने तिचा नाद सोडून दिला.