३५ वर्षीय महिलेचे लैंगिक शोषण की ? आरोपीसह १९ वर्षीय मुलीचाही तिच्यासोबत ‘ नको तो ‘ प्रकार

महाराष्ट्रात एक धक्कादायक घटना उघडकीस आली असून अमरावती इथे घडलेल्या या प्रकारात नेमके सत्य काय हे अद्यापही समोर आलेले नाही. अमरावती येथील एका महिलेच्या घरात जबरदस्तीने घुसून तिच्या इच्छेविरुद्ध तिचे लैंगिक शोषण तर केलेच मात्र याच युवकाने अन्य एका युवतीच्या मदतीने तिच्यासोबत अनैसर्गिक कृत्य देखील केले, असा या युवकावर आरोप आहे .अमरावती येथील गाडगेनगर ठाणे हद्दीतील केवल कॉलनीत १७ सप्टेंबर रोजी घडली असून शुक्रवारी रात्री उशिरा गुन्हा नोंदविला आहे. सदर आरोपीच्या या कृत्यात सहभागी असलेल्या दुसऱ्या १९ वर्षीय तरुणीवर देखील गुन्हा नोंदवण्यात आला आहे .
३५ वर्षीय विवाहित महिलेच्या फिर्यादीनुसार आरोपी फिर्यादीच्या घरात शिरला आणि घरात शिरताच जबरदस्तीने तिचे लैंगिक शोषण केले आणि या प्रकारात त्याला एका तरुणीने देखील मदत केली .

तपास सुरु असताना या महिलेसोबत आरोपीची आधीच ओळख असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे . सदर युवकाच्या सोबत असलेल्या १९ वर्षीय युवतीचे आपल्या पतीसोबत संबंध असल्याचा या पीडित महिला संशय होता. सदर तरुणी ही त्या युवकाच्या संपर्कात होती तसेच तिने या गुन्ह्यात आरोपीला अनैसर्गिक कृत्य करण्यास प्रत्यक्ष मदत केल्याच्या आरोपावरून पोलिसांनी तिलाही आरोपी केले असून ताब्यात घेतले आहे. पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक आसाराम चोरमले यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय आर. जे चंदापुरे करीत आहेत.

काय आहे प्रकरणाची दुसरी बाजू ?

पीडित महिला व तिचे पती उज्जैन येथे गेले होते. तेथून परत आल्यानंतर तिने पतीचा मोबाइल बघितला असता त्यात आरोपी तरुणीचा फोटो दिसला. तुमच्या मोबाइलमध्ये तिचा फोटो कसा असे महिलेने पतीला विचारले त्याने उडवाउडवीचे उत्तर दिले. त्यानंतर पीडित महिलेने त्या तरुणीचा बाबा हॉटेलनजीक शोध घेतला आणि तिचा बदला घेण्याकरिता महिलेने या तरुणासोबत प्लॅन रचला. तिचा पती घरी नसताना या तरुणाने तिच्यावर बलात्कार केला तर तरुणीने तिच्या गुदद्वारात नको तो प्रकार करून अनैसर्गिक कृत्य केल्याची तक्रार पीडितेने गाडगेनगर ठाण्यात नोंदविली असल्याने आता सत्य काय ते शोधण्याचे आव्हान पोलीसांपुढे उभे आहे.