किरीट सोमय्या यांना पहाटेच पोलिसांनी घेतलं ताब्यात, पत्रकार परिषदेत धक्कादायक आरोप

भाजप नेते किरीट सोमय्यांनी आताच पत्रकार परिषद घेतली असून त्यांनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे. हसन मुश्रीफ यांच्यामुळे मला अंबे मातेचं दर्शन घेता आलं नसल्याचं किरीट सोमय्यांनी म्हटलं आहे. तक्रार करणाऱ्यालाच अटक केली असल्याचा आरोप सोमय्यांनी यावेळी परिषदेत केला आहे. तक्रारदाराला रोखण्याचा इतिहास मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच करू शकतात, असंही किरीट सोमय्यां म्हणाले आहेत. भाजप नेते किरीट सोमय्या यांना पहाटे 4.30 च्या सुमारास पोलिसांनी कराडमध्ये ताब्यात घेतलं होतं. कोल्हापूर आणि सातारा पोलिसांनी ही संयुक्तरित्या कारवाई केली होती.

काय म्हणाले किरीट सोमय्या नक्की ?

मला सहा तास कोंडून ठेवलं. वकिलांनी नोटीस दिल्यानंतर मग मला विसर्जन करायला जाऊ दिलं. मला सीएसटी स्टेशनला अडवून ठेवलं.मला गाडी मिळणार नाही अशी व्यवस्था केली. पोलिसांनी खोटी बनवलेली ऑर्डर वाचून दाखवली अजी चॅलेंज केली तर पळून गेले. मुख्यमंत्री तुम्ही भगवा सोडून हिरवा धारण करा. पण आम्हाला आमचे सण साजरे करू द्या. गैरकायदेशीर डांबून ठेवणाऱ्या पोलिसांवर कारवाई व्हावी.

गनिमी काव्यानं हल्ला होऊ शकतो हे ऑर्डर मध्ये लिहिलंय मग हे इतर एजन्सीला का कळवलं नाही. माझ्यावर हल्ला कोण करणार हसन मुश्रीफ की त्यांचे गुंड ?. पोलिसांच्या विरोधात आम्ही हायकोर्टात जाणार असून माझ्यावर हल्ला व्हावा ही सरकारची इच्छा आहे का? भीतीने माझ्यावर हल्ला करणार आहे का? ही शरद पवार यांची रणनीती आहे का ?

मी केलेल्या तक्रारीवर चौकशी सुरू झाली असून ईडीने अतिरिक्त माहिती माझ्याकडे मागवली आहे. माझ्यावर या पूर्वी दोन वेळा शिवसेनेकडून हल्ला झाला आहे. माझ्या 170 कोटीच्या प्रश्नांचं उत्तर का देत नाहीत. मी हात जोडून विनंती केली की ऑर्डर दाखवा. पुराव्यासह मी कागल पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करणार होतो पण मला अडवलं गेलं. सीएसएमटी स्टेशनवर मला पोलिसांनी धक्काबुक्की देखील करण्यात आली. मुंबईबाहेर जाण्यापासून रोखण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश मला पोलिसांनी दाखवले.