फीचे तू टेन्शन घेऊ नको असं सांगून शिक्षकाचा अठरा वर्षीय तरुणीवर बलात्कार : कुठे घडली घटना ?

शेअर करा

एकीकडे पुण्यात कोरोनाने थैमान घातले असून दुसरीकडे गुन्हेगारीचे प्रमाण देखील वाढत आहे. नुकत्याच दाखल झालेल्या तक्रारीनुसार एका १८ वर्षीय तरुणीवर ३२ वर्षीय शिक्षकाने बलात्कार केल्याचा आरोप केला आहे. फीचे तू टेन्शन घेऊ नको असे सांगून त्याने मित्राच्या फ्लॅटवर नेऊन तिथे तिच्यावर बलात्कार केला. कोंढवा परिसरात घडलेल्या या घटनेनं पुण्यात खळबळ उडाली आहे.

दाखल झालेल्या तक्रारीनुसार, संबंधित तरुणी जिथे शिकते त्याच कॉलेजमध्ये आरोपी मोसीन शेख (वय ३२, रा. कौसरबाग, कोंढवा खुर्द) याने करिअर गाइडन्सवर लेक्चर दिले होते . त्यावेळी त्याने आपला मोबाईल नंबर तेथील विद्यार्थ्यांना दिला होता. तक्रारदार तरुणीला मर्चंट नेव्हीचा कोर्स करायचा होता. त्यासाठी तिने ४ जुलै रोजी शेख याला फोन केला. त्याने कौसरबागेतील क्लासमध्ये येण्यास सांगितले. त्यानुसार ही तरुणी आईला घेऊन क्लासमध्ये शेख याला भेटली. त्याने प्रवेश परिक्षेच्या फॉर्मचे बाराशे रुपये आणि क्लासची सात हजार रुपये फी सांगितली.

आठ जुलैला क्लास सुरू झाला. पण ही तरुणी पैसे भरू शकत नसल्याने क्लासला गेली नाही. ती तरुणी कलासला आली नाही म्हणून मौसीन याने संबंधित तरुणीला फोन करून भेटायला बोलवले. तुझ्या फीचे मी पाहतो, असे सांगून तिला कारमध्ये बसवून एका मित्राकडे काम असल्याचे सांगत तिला एका मित्राच्या घरी नेले. त्यानंतर तिथे तिच्यावर त्याने बलात्कार केला असल्याचे पीडित तरुणीचे म्हणणे आहे .बलात्कार केला असे कोणाला सांगू नकोस अशी धमकी देखील त्याने संबंधित तरुणीला दिली.

कोंढव्यातील अशोका म्युज येथे १० जुलैला दुपारी त्याने हा प्रकार केला. दुसर्‍या दिवशी या तरुणीने आपल्या आईला घडलेला प्रकार सांगितला आणि त्यांनी कोंढवा पोलिसांत तक्रार दिली. पीडित तरुणीने पोलिसांत तक्रार दिल्याची माहिती शेख याला समजल्यानंतर तो फरार झाला आहे. कोंढवा पोलीस त्याचा शोध घेत असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड यांनी दिली आहे.


शेअर करा