नगरच्या महिलेची सौताडा धबधब्यावरून उडी घेऊन आत्महत्या

शेअर करा

कोरोना संकटानंतर नागरिकांच्या मानसिकतेवर नकारात्मक परिणाम झालेला असून नागरिक कोणत्याही गोष्टीनंतर टोकाची भूमिका घेत असल्याचे दिसते आहे. अशीच एक धक्कादायक घटना बीड जिल्ह्यात उघडकीस आली असून जिल्ह्यातील सौताडा धबधब्यावरून एका महिलेने उडी घेत आत्महत्या केली आहे. सोमवारी 20 तारखेला फिरायला आलेल्या पर्यटकांना तिचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आला.

उपलब्ध वृत्तानुसार, सोमवारी संध्याकाळी सहा वाजण्याच्या सुमारास सौताडा धबधब्याच्या पाण्यात एका महिलेचे प्रेत पर्यटकांना दिसून आले. सौताडा गावातील युवकांच्या मदतीने हे प्रेत पाण्यातून बाहेर काढण्यात आले. धबधब्याजवळ एक पर्स आणि मोबाईल आढळून आला त्यावरून या महिलेची ओळख पटवण्यात आली. मयत महिलेचे नाव रोहिणी सोमेश्वर कुलकर्णी ( वय 53 राहणार केडगाव तारा बाग कॉलनी) असे आहे. संबंधित महिलेच्या मोबाईलवरून तिच्या नातेवाईकांना याबाबत माहिती कळविण्यात आली.

दोन महिन्यापूर्वी या महिलेच्या विवाहित मुलीचे अपघाती निधन झाले होते. त्यानंतर मुलीच्या मृत्यूच्या घटनेनंतर सदर महिला नैराश्यात गेलेल्या होत्या. याच नैराश्यातून त्यांनी आत्महत्या केली असावी, असा जबाब महिलेचा मुलगा व त्यांचे नातेवाईक यांनी पाटोदा पोलिसांना दिला आहे. सदर महिलेचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यासाठी सौताडा गावातील विशाल मस्के, संदीप गायकवाड, राहुल मस्के, नितीन शिंदे, अशोक सानप, प्रशांत घुले, आकाश मस्के व बाबा उबाळे यांनी सहकार्य केले. पाटोदा ग्रामीण रुग्णालयात डॉक्टर सदाशिव राऊत यांनी या महिलेचे शवविच्छेदन केले .


शेअर करा