नगर मनपा विद्युत कर्मचाऱ्यांच्या ‘ कोरोना हँगओव्हर ‘ मुळे नागरिकांच्या जीवाशी खेळ

शेअर करा

नगर जिल्ह्यासह कोरोनाच्या काळात लॉकडाऊन असल्याने नागरिकांना देखील घराबाहेर पडण्याची बंदी होती त्यामुळे पथदिवे लावायचे तरी कुणासाठी ? यामुळे शहर आणि उपनगरात सह अनेक भागात रस्त्यावरील पथदिवे बंद ठेवण्यात येत होते मात्र आता लॉक डाउन शिथिल झाला असला तरीदेखील कर्मचारी अद्यापही लॉकडाउनच्या मूडमध्येच असल्याने शहरासह उपनगरात पथदिवे संध्याकाळी देखील सुरू केले जात नाहीत त्यामुळे अंधारात चाचपडत मार्ग काढणारे नगरकर हे चित्र सामान्य झाले आहे .

आधीच पावसामुळे नगर शहरातील रस्त्यांची पूर्णपणे वाट लागलेली असून अशा वेळेस किमान पथदिवे सुरू ठेवले तर नागरिकांना चालणे तसेच गाडी चालवणे सोपे होईल आणि संभाव्य अपघातापासून ते वाचू शकतील मात्र विद्युत विभागाच्या महापालिका कर्मचाऱ्यांना याचा पूर्णपणे विसर पडलेला असून शहरातील बहुतांश सर्व उपनगरात एक तर पथदिवे सुरूच केले जात नाहीत क्वचित काही ठिकाणी सुरू केले तर ते लवकरच बंद केले जातात. कोरोनाच्या काळात कोरोना नावाखाली सर्व जबाबदाऱ्या झटकणाऱ्या मनपा अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी कधीतरी नागरिकांचा विचार करावा, अशी अपेक्षा आता नगरकर व्यक्त करत आहेत.

नगरमधील जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येत असल्याने नागरिकांची रस्त्यांवर गर्दी वाढलेली आहे अशावेळेस आधीच खराब रस्ते आणि त्यात पथदिवे बंद यामुळे अपघात होऊन नागरिकांच्या जीवितास देखील धोका निर्माण झालेला आहे हे पथदिवे पुन्हा पूर्ववत सुरू करावेत अशी मागणी नागरिक व्यक्त करत आहेत.


शेअर करा