सातारा हादरले..अल्पवयीन मुलीच्या मामाच्या व्हाट्सएप्पवर मेसेज आला की ..

शेअर करा

महाराष्ट्रात सध्या अल्पवयीन मुलींवर अत्याचाराच्या अनेक घटना समोर येत असतानाच सातारा इथे एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे .एका सोळा वर्षांच्या मुलीशी तरूणाने मैत्री करून तिचा विश्वास संपादन केला आणि त्यानंतर धमकी देत एके दिवशी व्हिडीओ काॅल करून मुलीला अंगावरील सगळे कपडे उतरायला लावले मात्र दुसरीकडे या सगळ्याची रेकॉर्डिंग केली आणि त्या मुलीच्या मामाच्या व्हाट्सअपवर देखील पाठवली. राहुल सुर्वे उर्फ सत्यम मिश्रा असे गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपीचे नाव असून तो सध्या फरार झाला आहे.

सातारा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित सोळा वर्षाच्या मुलीला एके दिवशी व्हॅटसअॅपवर राहुल सुर्वेने मेसेज केला आणि त्यानंतर दोघांची मैत्री झाली. त्यानंतर आरोपीने पीडित मुलीला धमकी देत व्हीडिओ कॉल करून कपडे उतरवायला लावले आणि त्याचे रेकॉर्डिंग केले मात्र आरोपीची वागणूक पाहता काही कालावधीत या मुलीने त्याला प्रतिसाद देणे बंद केले. उपलब्ध असलेल्या या व्हिडीओ कॉलचे काही फोटो त्याने तयार करून मुलीच्या मामाला पाठविले. या प्रकारानंतर मुलीच्या घरातल्यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली.

पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल करून राहुल सुर्वेचा शोध घेण्यास सुरूवात केली आहे मात्र त्याचा मोबाईल बंद असून पोलिसांनी त्याच्या शोधासाठी ठिकठिकाणी पथके रवाना केली आहेत. लवकरच तो हाती लागेल, असे पोलीस उपनिरीक्षक शेख यांनी सांगितले असून सदर प्रकरणाचा उपनिरीक्षक शेख हे अधिक तपास करत आहेत.


शेअर करा