नागपूर हादरले..आईला वाटायचं मुलगा तृतीयपंथीच आहे मात्र अचानक ‘ दार उघडले ‘ अन…

शेअर करा

समाजात काही अशा घटना घडतात की समाजमन सुन्न होते. अशीच एक घटना नागपूर इथे उघडकीस आली असून एका विकृत व्यक्तीने स्वतःच्या आठ वर्षे मुलीवर अत्याचार केला. एवढेच नव्हे तर त्याने भावाच्या सात वर्षीय मुलासोबत देखील अनैसर्गिक कृत्य केले. शुक्रवारी रात्री या प्रकरणी नागपूर येथे हुडकेश्‍वर पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर या घटनेचा परिसरात चांगलाच बोभाटा झाला. सदर आरोपी विरुद्ध कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिक करत आहे.

उपलब्ध माहितीनुसार, संजा असे या नराधमाचे नाव असून चाळीस वर्षे त्याचे वय आहे. तो कामचुकार तर आहेच मात्र याव्यतिरिक्त देखील त्याला अनेक विकृती जडलेल्या आहेत. तृतीयपंथी व्यक्तीचा वेश धारण करून तो घराबाहेर पडतो आणि रस्त्यावर लोकांना पैसे मागतो. घरच्या महिलांसोबत देखील त्याचे वर्तन विकृत असल्याने त्याची आणि त्याच्या भावाची पत्नी या दोन्ही महिला याच्या विकृतीला कंटाळून निघून गेल्या. त्यामुळे संज्याची आठ वर्षीय मुलगी, त्याचा भाऊ आणि भावाचा सात वर्षाचा मुलगा, वृद्ध आई असे पाच जण हुडकेश्वरमध्ये राहतात. भाऊ चौकीदार आहे तर आई घरगुती कामे करते.

शुक्रवारी दुपारी अचानक संजयची आई घरी परतली. तिने दार उघडून पाहताच विवस्त्र अवस्थेतील नराधम संज्या चिमुकलीवर अत्याचार करताना आईला दिसून आला. बाजूला सात वर्षे चिमुकला मुलगा देखील थरकाप उडालेल्या अवस्थेत होता. त्यानंतर संतापलेल्या आईने त्याला लाथ घालून दूर केले आणि शिवीगाळ करून दोन्ही चिमुरड्यांना घराबाहेर काढले. शिवीगाळ केल्यानंतर शेजाऱ्यांनी चौकशी केल्यानंतर हा प्रकार उघड झाला. त्यानंतर दोन्ही चिमुरड्यांना घेऊन आई पोलीस ठाण्यात गेली आणि आणि त्यानंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपीला अटक केली.


शेअर करा