.. म्हणून ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये राहणाऱ्या प्रेयसीचा एका बुक्कीत दात पाडला

शेअर करा

‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये राहणारी प्रेयसी घरात बडबड करीत असल्यामुळे चिडलेल्या प्रियकराने एका बुक्कीत प्रेयसीचा दात पाडल्याची धक्कादायक घटना नागपूर इथे घडली असून सदर प्रेयसीने पोलिसात तक्रार दिल्यानंतर तिच्या प्रियकराच्या विरोधात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे . सातत्याने तिचा प्रियकर हा दारू पिऊन तिच्यावर संशय घेत होता त्यामुळे वाद सुरु झाला होता.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला (वय ३६) ही कपिलनगर मध्ये राहत असून तिच्या पतीचे आठ वर्षांपूर्वी निधन झाले. तिला एक १३ वर्षांची मुलगी आहे. दरम्यान तिची ओळख मनपामध्ये कंत्राटी सफाई कामगार प्रणय राजू गजभिये (३१) याच्याशी झाली आणि त्यांनी सोबत राहण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला प्रणयनेही तिला तिच्या मुलीसह स्वीकारण्याची तयारी दर्शविली त्यामुळे ते सोबत रहायला लागले मात्र काही दिवसातच त्याने तिच्या चारित्र्यावर संशय घेण्यास सुरुवात केली. सातत्याने दारू पिऊन तो तिला त्रास देऊ लागला.

दोघेही गेल्या सात वर्षांपासून ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये राहत होते . शनिवारी सायंकाळी सहा वाजता प्रणय घरी आला. त्यावेळी प्रेयसीने घरात बडबड सुरू केली. त्यामुळे प्रणय चिडला मात्र ती गप्प न बसता बडबड करीत होती. त्यामुळे प्रयणने रागाच्या भरात तिच्या तोंडावर बुक्की मारली. त्यात तिचा दात तुटून हातात आला. तिने तात्काळ थेट पोलिस स्टेशन गाठून प्रियकराविरूद्ध तक्रार केली. पीआय अमोल देशमुख यांनी तक्रार ऐकून घेत गुन्हा दाखल केला असून तपास सुरु आहे .


शेअर करा