लग्नाच्या आमिषाने चक्क शंभरहून अधिक महिलांची ‘ ह्या ‘ व्यक्तीकडून फसवणूक मात्र पुण्यात बेड्या : पहा फोटो

शेअर करा

लग्नाचे आमिष दाखवून देशभरातील एक नाही, दोन नाही, तर चक्क 100 पेक्षा अधिक तरुणींना फसवून त्यांच्याकडून कोट्यवधी रुपये लाटणाऱ्या एका इसमाला पिंपरी चिंचवड पोलिसांनी अटक केली आहे. असल्या ‘लखोबा लोखंडे’ चा हा प्रताप ऐकून पोलीसही हैराण झाले आहे. प्रेमराज थेवराज डिक्रूझ असं याच खर नाव असून तो मुळचा तामिळनाडू इथं राहणार आहे. प्रेमराजने शेकडो महिलांना लग्नाचं आमिष दाखवून त्यांच्याकडून पैसे हडप केले आहेत .

अत्यंत सॉफिस्केटेड आणि सुशिक्षित दिसणारा प्रेमराज हा अविवाहित आणि त्यातही शक्यतो विधवा, परित्यक्ता महिलांना हेरून त्यांना आपल्या प्रेमात पाडायचा.मी काँट्रॅक्टर आहे ,बिझनेसमन आहे, बिल्डर आहे असं खोटं सांगून विश्वास संपादन करायचा. त्यानंतर त्याचा प्रेमाचा ड्रामा सुरू करायचा त्यानंतर पुढे जाऊन त्याने अनेक जणींसोबत साखरपुडा देखील केला मात्र त्यानंतर वेगवेगळी कारणे देत त्यांना आर्थिक मदत मागायचा आणि त्यानंतर पसार व्हायचा.

प्रेमराज डिक्रूझने देशभरात सुमारे100 पेक्षा अधिक महिलांना याच पद्धतीने फसवले आहे मात्र एका महिलेने पोलिसांकडे डिक्रूझ विरुद्ध तक्रार केली आणि डिक्रूझच्या साळसूदपणाचा बुरखा फाडून त्याचा विकृताचा चेहरा समोर आणला. पुणे, ठाणे, मालाड, मुंबई, तामिळनाडू, चेन्नई, गुजरात अशा अनेक ठिकाणी डिक्रूझने अनेकजनींना फसविल्याच्या तक्रारी आता दाखल होत असून या व्यक्तीने कोणाची फसवणूक केली असल्यास समोर येण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे .7 मोबाईल, 32 सिमकार्ड, दोन पॅन कार्ड, दोन आधारकार्ड आणि आणि बनावट पासपोर्टसह अनेक कागदपत्रे त्याच्याकडे आढळून आली आहेत.


शेअर करा