औरंगाबाद हादरले..मुलीच्या आई-वडिलांच्या मोबाईलवर ‘ तसले ‘ फोटो पाठवून भलतीच मागणी

शेअर करा

आपल्या एका वर्गमैत्रिणीच्या लग्नात ओळख झाल्यानंतर एका तरुणाने लग्नाचे आमिष दाखवून डॉक्टर तरुणीवर अनेकवेळा अत्याचार केला. त्याच कालावधीत सोबत काढलेली आक्षेपार्ह छायाचित्रे व व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत त्याने १० लाख रुपयांची खंडणी मागितली. संतप्त तरुणीने यानंतर कुटुंबीयांना माहिती दिली आणि आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. अत्याचार करणाऱ्या आरोपीचे नाव अजहर अश्फाक शेख (रा. घाटकोपर वेस्ट, मुंबई) असून त्यास ओसामा खान व हमजा पठाण यांनी देखील मदत केल्याचे तरुणीचे म्हणणे आहे औरंगाबाद येथील सिटी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरु असल्याचे समजते.

उपलब्ध वृत्तानुसार, पीडित तरुणीचे बीडीएसचे शिक्षण झाले असून, ती एका खाजगी दवाखान्यात प्रॅक्टिस करते याचदरम्यान एका वर्गमैत्रिणीने लग्नात तरुणीची ओळख तिचा नातेवाईक अजहर शेख याच्यासह त्याच्या आई व बहिणीची ओळख करून दिली. त्याने पहिल्याच भेटीत तू मला आवडत असून आपण लग्न करू, अशी गळ घातली. आपण लवकरच सौदी एअरलाइन्समध्ये नोकरी लागणार असून, आपण जेद्दा येथे स्थायिक होऊ, असेही आमिष दाखविले यातून त्यांची मैत्री वाढत गेली.

काही दिवसांनी आरोपीने २१ नोव्हेंबर २०२० रोजी औरंगाबादेत एका हॉटेलवर भेटण्यास बोलवले आणि तिथे अत्याचार केला. हॉटेलमध्ये त्याने तिचे काही फोटो देखील काढले आणि काही व्हिडिओ देखील काढले व ते व्हायरल करण्याची धमकी देत ९, १० जानेवारी, १ व २२ फेब्रुवारी २०२१ रोजी विविध ठिकाणी नेऊन तिच्यावर अत्याचार केला. हद्द तर तेव्हा झाली की त्याने मुलीच्या आई – वडिलांच्या मोबाईलवर तिची छायाचित्रे व व्हिडिओ पाठवून १० लाख रुपयांची मागणी केली. आपल्या मुलीसोबत झालेला हा प्रकार ऐकून मुलीच्या आईवडिलांना धक्काच बसला आणि त्यांनी आरोपीच्या विरोधात पोलीस ठाण्यात धाव घेतली.


शेअर करा