प्रत्येक कुटुंबाच्या अशा काही खासगी गोष्टी असतात ज्या कधीच लोकांना माहिती होऊ नयेत असा प्रयत्न कुटुंबीय करत असते मात्र जर आपली सुनबाई पब्लिक फिगर असेल तर काय ? याचे उत्तर कोणाकडेच नाही शिवाय इतिहास तर बदलता येत नाही , अशीच एक घटना अमेरिकेत उघडकीस आली आहे. महिलेच्या सासरकडच्या लोकांना हे समजलं की त्यांची सून आधी अडल्ट स्टार म्हणून काम करायची तेव्हा त्यांना धक्काच बसला अन त्यांनी तिला आणि तिच्यासहित मुलाला देखील घराबाहेर हाकलून दिले.
उपलब्ध वृत्तानुसार, शेनन रोज असे या महिलेचे नाव असून तिचे वयाच्या ३६ व्या वर्षी लग्न झाले होते. शेनन 18 वर्षाची झाली तेव्हा ती एका कल्बमध्ये स्ट्रिपर म्हणून काम करायची मात्र त्यात काही जास्त पैसे मिळत नसल्याने तिने काही कालावधीतच अडल्ट इंडस्ट्रीमध्ये फूल टाईम काम करण्यास सुरुवात केली. 10 वर्ष याच इंडस्ट्रीत काम करून शेनननं भरपूर पैसे कमावले मात्र यात तिला हवे ते समाधान मिळत नव्हते. तिला स्वतःचा संसार थाटायचा होता म्हणून तिने डेटिंगच्या वेबसाईटवर आपली नोंद केली आणि ट्रेविस नावाच्या व्यक्तीसोबत सोबत डेटींगला सुरुवात केली आणि काही काळातच दोघांनी लग्न देखील केले.
ट्रेविसनं शेननच्या भुताकाळासोबत तिला स्वीकारलं मात्र शेनन याआधी अडल्ट स्टार असल्याचं ट्रेविसच्या घरच्यांना माहिती होताच त्यांनी त्याला शेननला सोडण्याचा सल्ला दिला. ट्रेविसनं आपल्या घरच्यांचं ऐकलं नाही म्हणून त्याच्या कुटुंबीयांनी त्याला घरातून आणि फॅमिली बिजनेसमधून बाहेर केलं. शेनन आणि तिच्या पतीने खचून न जात नव्या जोमाने नवीन व्यवसाय निवडला असून सोशल मीडियाच्या माध्यमातून कमाईचं नवं साधन शोधलं आहे. दोघांनी आपली फिरण्याची हौस पूर्ण करत ट्रॅव्हल संदर्भात व्ही लॉग सुरू केला असून दोघांचे आता चार लाख फॉलोअर्स आहेत.
डेली स्टारसोबत बोलताना शेणन म्हणाली होती की , ‘ जेव्हा ती खूप लहान होती तेव्हाच तिच्या वडिलांनी तिच्या आईला धोका दिला. पत्नीच्याच चांगल्या मैत्रिणीसोबत तिच्या वडिलांचं अफेअर होतं. यानंतर त्या दोघांनी लग्न केलं आणि शेननची दुसरी आई तिचा मानसिक आणि शारीरिक छळ करू लागली. कमी वयातच शेनन मानसिकरित्या पूर्णपणे खचली आणि तिनं आधी स्ट्रीपर न त्यानंतर अडल्ट मध्ये काम करणं सुरू केलं .