पुणे हादरले .. सख्ख्या मोठ्या भावाने बहिणीला दिले पेटवून : काय आहे कारण ?

शेअर करा

पुण्यात संपत्तीच्या वादातून चक्क सख्ख्या मोठ्या बहिणीला पेटवून देऊन जीवे ठार मारण्याचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना पुण्यातील औंधमध्ये घडली असून जखमी महिलेवर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहे. फ्लॅट कोणाच्या मालकीचा यावरून बहीण भावात गेल्या काही वर्षांपासून वाद होता त्यानंतर त्याचे पर्यवसान असे होईल असे कोणालाही वाटले नव्हते.

उपलब्ध वृत्तानुसार , पुणे जिल्ह्यातील औंध तालुक्यातील अनुसया सोसायटीत शुक्रवारी दुपारी ही घटना घडली. शरद मनोहर पतंगे (वय 45) असं या अटक करण्यात आलेल्या भावाचं नाव असून राजश्री मनोहर पतंगे ( वय 48) असं जखमी महिलेचं नाव आहे. औंध परिसरात अनुसया हौसिंग सोसायटीमध्ये राजश्री पतंगे राहतात. त्यांचं लग्न झालं नाही मात्र त्या राहत असलेला फ्लॅट हा त्यांच्या आईच्या नावावर आहे.

दोन वर्षांपूर्वी त्यांच्या आई आणि वडिलांचं निधन झालं आहे. त्यामुळे फ्लॅट नावावर करण्यावरून आरोपी शरद आणि राजश्री यांच्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू होता. आरोपी शरदने हा फ्लॅट आपल्या नावावर करून द्यावा अशी मागणी तो बहिणेकडे करत होता मात्र त्यास बहिणीने नकार दिला होता. शुक्रवारी दुपारी शरद हा दारू पिऊन राजश्रीच्या घरी आला होता त्यावेळी राजश्री आणि शरदमध्ये पुन्हा एकदा फ्लॅट नावावर करण्यावरून वाद सुरू झाला.

रागाच्या भरात आरोपी शरद याने राजश्रीच्या साडीला आग लावून पेटवून दिले मात्र लहान भाऊ त्या ठिकाणी असल्याने त्याने आग विझवण्याचा प्रयत्न केला मात्र यात तोही भाजला. राजश्री यांच्या चेहरा आणि मानेपासून पायापर्यंत भाग भाजला असून त्यांना तातडीने ससून रुग्णालयात दाखल केले आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहे.राजश्री यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी शरद याच्याविरोधात गुन्हा दाखल केला असून अटक करण्यात आली आहे.


शेअर करा