नवऱ्याने चक्क बायकोची हळदकुंकू लावून पूजा केली मात्र ‘ मास्टरप्लॅन ‘ वेगळाच होता

शेअर करा

देशाला स्वातंत्र्य मिळून अनेक वर्षे झाली तरीदेखील अंधश्रद्धेचे भूत लोकांच्या मनातून उतरण्याचे काही नाव घेत नाही ही अशीच एक धक्कादायक घटना जालना जिल्ह्यातील टेंभुर्णी येथे उघडकीस आली असून दारूच्या आहारी गेलेल्या पतीने चक्क गुप्तधन शोधण्यासाठी एका मांत्रिकाच्या मदतीने आपल्या पत्नीचा बळी देण्याची तयारी केली. जालना जिल्ह्यातील जाफराबाद तालुक्यातील डोणगाव येथे ही घटना गुरुवारी उघडकीस आली आहे . पोलिसांनी या प्रकरणात पतीसह मांत्रिक असलेली एक महिला व एका व्यक्तीला ताब्यात घेतले आहे.

उपलब्ध वृत्तानुसार, सीमा संतोष पिंपळे ( राहणार डोणगाव ) असे या पीडित महिलेचे नाव आहे. 22 सप्टेंबर रोजी रात्री संतोष पिंपळेसह जीवन पिंपळे व एक मांत्रिक महिला घरी आली आली आणि घरातील लाकडी खांबाला काहीतरी धरबंधन करून गेली. त्यानंतर संतोषने पत्नी सीमाच्या अंगाला हळद कुंकू अगरबत्ती लावण्याचा प्रयत्न केला. तिने विरोध केल्यानंतर तिला मारहाण करण्यात आली. तिचा आरडाओरडा ऐकून मुलगा व शेजार्‍यांनी धाव घेत तिची सुटका केली.

पोलिसांनी या प्रकारात नरबळी देण्याचा प्रयत्न केल्यावरून तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून संतोष पिंपळे व जीवन पिंपळे या दोघांना अटक केली आहे त्यांना न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली असून मांत्रिक महिलेला देखील रविवारी अटक करण्यात आली आहे.


शेअर करा