.. अन अमेरिकेत काम करणाऱ्या पतीने चक्क लग्नातील भेटवस्तू देखील सोडल्या नाहीत

शेअर करा

अमेरिकेत असताना मानसिक त्रास व क्रूर वागणूक देऊन लग्नात मिळालेल्या भेटवस्तूंचा अपहार करून संयुक्त खात्यातील 48 लाख 62 हजार रुपये परस्पर काढून घेऊन विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी पुणे इथे वारजे पोलिसांनी पतीसह तीन जणांवर गुन्हा दाखल केला आहे .

उपलब्ध वृत्तानुसार, प्रियाल पालकर असे या पतीचे नाव आहे. या प्रकरणी 32 वर्षाच्या विवाहितेने वारजे पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. हा प्रकार 25 सप्टेंबर 2014 ते 2020 पर्यंत सुरू होता. फिर्यादी व आरोपी यांचा 2014 मध्ये विवाह झाला. त्यानंतर पीडिता अमेरिकेतील कॅलिफोर्निया येथे नोकरीला गेली. दोघांचेही बँकेत संयुक्त खाते होते मात्र तिथेदेखील पतीने पत्नीचा छळ केला आणि त्यांच्या संयुक्त बँक खात्यातून 84 हजार 801 अमेरिकन डॉलर पीडितेच्या संमतीशिवाय काढून घेतले.

तक्रार केल्यास त्यांना मारहाण आणि शिवीगाळ करून धमकी दिली, या छळाला कंटाळून फिर्यादी अमेरिकेतून भारतात आल्या. ठाणे येथे या महिलेचे सासर असून अमेरिकेत काम करणारा मुलगा आर्थिकदृष्ट्या चांगला सक्षम आहे हे असे पाहून हा विवाह जुळला होता मात्र सदर महिलेला अमेरिकेत जाऊन अनेक स्वरूपाच्या मानसिक त्रासाला समोर जावे लागल्याने त्यांनी पुन्हा भारताची वाट धरली आहे.


शेअर करा