‘ ओ शेठ तुम्ही नादच केलाय थेट ‘ गाण्याचा तिढा अखेर सुटला , काय होते प्रकरण ?

शेअर करा

‘ ओ शेठ तुम्ही नादच केलाय थेट ‘ या गाण्याने अल्पावधीतच सोशल मीडियात चक्क धुमाकूळ घातला. या गाण्याचे गायक उमेश गवळी संगीतकार अनिकेत खुणे आणि निर्मात्या संध्या केशे या त्रिकुटाला अल्पावधीतच मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी देखील मिळाली,मी मात्र प्रसिद्धी मिळताच या गाण्याला कॉपीराईटचे ग्रहण लागले अन या त्रिकुटाचा वाद सुरू झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की युट्युबवरून देखील हे गाणे हटविण्यात आले.

बरेच दिवसापासून या त्रिकुटामध्ये समेट घडवण्याचे प्रयत्न होत होते मात्र त्याला यश येत नव्हते, अखेर महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेना आणि अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या मध्यस्थी त्यामुळे हा वाद मिटला. यावेळी उमेश गवळी म्हणाले की, ‘ गेल्या काही दिवसांपासून आम्हा तिघांमध्ये संवाद नव्हता त्यामुळे एकमेकांबद्दल गैरसमज पसरवणारी वक्तव्य करण्यात आली. मात्र आता आम्ही तिघांनी एकत्र येऊन मनसे चित्रपट सेना व मराठी चित्रपट महामंडळ यांच्या प्रयत्नातून हा वाद मिटलेला आहे.

या त्रिकुटाच्या वादामुळे अत्यंत लोकप्रिय झालेले हे गाणे युट्युब वरून हटवल्याने या तिघांचे देखील मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होते. त्यामुळे मनसे पदाधिकाऱ्यांना यात लक्ष घालावे लागले. मनसेचे चित्रपट सेनेचे उपाध्यक्ष रमेश परदेशी, चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांच्या माध्यमातून हा वाद सोडविण्यात आला.


शेअर करा