‘ त्या ‘ कुटुंबाच्या मृत्यूपूर्व चिठ्ठीत लिहले होते असे काही ?, सहकुटुंब केली होती आत्महत्या

शेअर करा

कोरोना संकटाने देशातील व्यवसाय आणि रोजगार पूर्णपणे ठप्प पडलेले आहेत, त्यातून लोकांमध्ये नैराश्याची भावना प्रबळ होत असून शुल्लक कारणावरून लोक आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलत आहेत . महाराष्ट्रात गेल्या काही दिवसात आत्महत्या आणि गुन्हेगारीचे प्रमाण वाढलेले आहे. अशातच सोलापूर येथील एका व्यावसायिकाने संपूर्ण परिवारासहित आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली होती. प्राथमिक माहितीनुसार आर्थिक अडचणीतून ही आत्महत्या झाल्याचा अंदाज होता आणि त्या ठिकाणावरून एक चिठ्ठी पोलिसांनी हस्तगत केली होती. त्यामधील मजकूर आता पोलिसांनी आता उघड केला आहे .

सोलापुरातील जुना पुणे नाका हांडे प्लॉट परिसरात एका घरात पती पत्नी आणि दोन मुलांचा मृतदेह आढळून आला होता .अमोल अशोक जगताप (वय ३७ ), पत्नी मयुरी अमोल जगताप (वय २७), मुलगा आदित्य अमोल जगताप (वय ०७) आणि आयुष अमोल जगताप (वय ४, हांडे प्लॉट, जुना पुना नाका सोलापूर ) अशी मृतांची नावे होती .

जगताप हे घर भाड्याने घेऊन राहत होते. मयत अमोल यांनी मृत्यूपूर्वी लिहलेल्या चिठ्ठीत ‘मला सहा लाख रुपयांचं देणं आहे. माझ्या नावे असलेली संपत्ती विकून टाका आणि आलेल्या पैशांमधून नातेवाईक अन् इतरांचं देणं देऊन टाका. आम्हा सर्वांचे अवयवदान करा’, असा उल्लेख केलेला आहे .

अमोल जगताप हे कोंडी येथील हॉटेल गॅलक्सी हे डान्स बार चालवत होते. लॉकडाऊनमुळे हॉटेल बंद असल्यामुळे अमोल जगताप हे आर्थिक अडचणीत आले होते. त्यांनी पूर्वी नातेवाईकांकडून सहा लाख रुपये घेतले होते. ते पैसे त्यांना परत करावयाचे होते. लॉकडाऊनमुळे ते आर्थिक अडचणीत आले होते त्यातून त्यांनी स्वत:ला, पत्नी व दोन मुलांना संपवण्याचा निर्णय घेतला.

घटनस्थळी अमोलची पत्नी मयुरी ही पलंगावर पडलेली होती तिच्या अंगावर मारहाणीच्या खुणा होत्या. दोन चिमुकल्यांना आणि त्यांच्या आईला गळफास देऊन त्यांचा खून केला आणि मग अमोल यांनी स्वत: आत्महत्या केली असावी असा अंदाज खरा ठरला आहे .

अमोल जगताप यांनी राहत्या घरी पत्नी मयूरी, मुलगा आदित्य व आयुष या तिघांचा खून केल्याप्रकरणी फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत मोठे बंधू राहुल अशोक जगताप (वय ४६, रा. उमानगरी, मुरारजी पेठ, सोलापूर) यांनी फिर्याद दिली आहे. तपास पोलीस निरीक्षक संजय साळुंखे करीत आहेत.


शेअर करा