नाती शर्मसार.. पतीच्या संमतीने झालेल्या ‘ तसल्या ‘ प्रकारातून एक मुलगीही झाली अन आता..

शेअर करा

पती-पत्नी आणि दीर-भावजयी यांच्या नात्याला काळीमा फासणारी अत्यंत संतापजनक घटना मध्यप्रदेशच्या मुरैना जिल्ह्यातून समोर आली आहे. आरोपी दीर हा पीडितेला तिचं लग्न झाल्यापासून वारंवार छळत होता. पीडिता विरोध करत असताना देखील त्याने बळजबरी करत वारंवार तिच्यावर बलात्कार केला. दिराच्या या त्रासाबद्दल पीडितेने पतीला सांगितले असता पतीने दीराला काही बोलण्याऐवजी पीडितेलाच तिचं आयुष्य उद्ध्वस्त करण्याची धमकी दिली. अत्याचारातून पीडित महिलेला मुलगी देखील झाली मात्र आता त्यानंतर पतीने पत्नीचे लग्न दीरासोबत लग्न लावून देण्याचा हट्ट धरला आहे. घरामध्येच होणाऱ्या या घृणास्पद अत्याचाराला कंटाळून पीडितेने अखेर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

काय हे पीडितेची तक्रार ?

पीडितेचं 6 मार्च 2018 रोजी मुरैयाच्या आदर्श कॉलनीत राहणाऱ्या व्यक्तीसोबत लग्न झालं होतं. लग्नापासूनच तिच्या पतीने तिच्यासोबत कोणतेही संबंध ठेवले नाहीत तर दोघं घरात वेगवेगळ्या खोलीत राहत होते. 13 सप्टेंबरला महिलेचा दीर रात्रीच्या वेळी तिच्या खोलीत शिरला आणि त्याने महिलेवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. पीडितेने मदतीची याचना करत आरडाओरड करताच पीडितेचा पती तिथे आला आणि त्याने आपल्या पत्नीला गप्प राहण्यास सांगितलं अन दिराचीच बाजू घेतली .

त्या दिवसांपासून पीडित महिलेसोबत दररोज दिराकडून तसला प्रकार सुरु झाला मात्र पीडिता पतीच्या दबावाखाली शांतपणे सोसत राहिली. पीडितेचा दीर तिच्यावर दररोज अत्याचार करत होता. आरोपी दीराने पीडितेवर अत्याचार करत असताना आपत्तीजनक व्हिडीओ देखील बनवला. तो व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करण्याची धमकी देत तो महिलेवर वारंवार अत्याचार करत होता. काही कालावधीत आरोपीच्या अत्याचारातून पीडितेने एका मुलीला जन्म दिला.

अशाच रीतीने महिलेने अत्याचार सोसल्यानंतर पीडितेचा पती आता तिचं लग्न त्याच्या लहान भावासोबत करण्याचा घाट घालत आहे मात्र त्यास पीडित महिलेचा विरोध आहे. दोघांमध्ये यावरून भांडण झाल्यानंतर पीडितेने पोलीस ठाण्यात धाव घेत पती आणि दीराविरोधात तक्रार केली. पोलिसांनी संबंधित घटनेची गांभिर्याने दखल घेत पती आणि दीराविरोधात गुन्हा दाखल केला आहे.


शेअर करा