‘ मॅडम आमच्या जवानांची टेस्ट करायची आहे ‘, नागपूरच्या महिलेला फोन आला अन त्यानंतर ..

शेअर करा

मी आर्मीत काम करणारा असल्याचे सांगून जवानांची टेस्ट करून घ्यायची आहे, अशी थाप मारून एका भामट्याने नागपूर येथील एका फिजिओथेरपीच्या संचालिकेची आर्थिक फसवणूक केली आहे. तिच्या बँक खात्याची माहिती घेतल्यानंतर या भामट्याने तिच्या खात्यांमधील एक लाख 80 हजार रुपये लंपास केले. आपली माहिती त्रयस्थ व्यक्तीला शेअर केल्यामुळे या महिलेला मोठा आर्थिक फटका बसला.

उपलब्ध वृत्तानुसार, रेशीम बागेत राहणाऱ्या मनीषा मोटघरे या फिजिओथेरपी क्लिनिक चालवतात. सोमवारी सकाळी नऊ वाजता यांच्या मोबाईलवर सतीशकुमार नावाच्या एका भामट्याचा फोन आला. मी आर्मीत करणारा असून तुमच्या फिजिओथेरपी क्लिनिकमध्ये कुठल्या पद्धतीचे उपचार केले जातात याची विचारणा त्यांने केली. मोटघरे यांनी त्याला सविस्तर माहिती दिल्यानंतर त्याने आपल्या जवानांची तुम्ही टेस्ट करून देणार का ? असे म्हणत विचारणा केली. त्यानंतर रक्कम कोणत्या खात्यात जमा करायचे ? असे देखील त्याने विचारले.

एकंदरीत त्याच्या बोलण्यावरून मोटघरे यांना त्याच्यावर संशय आला नाही आणि त्यांनी त्याला आपले सर्व बँक खात्याचे डिटेल्स फोनवरच सांगितले. त्याचा गैरफायदा घेत त्याने मोटघरे यांच्या बँक खात्यातून एक लाख 80 हजार रुपये लंपास केले. पैसे वजा झाल्याचे मेसेज आल्यानंतर मोटघरे यांना धक्काच बसला आणि त्यांनी पोलिसांकडे फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.


शेअर करा