कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकांच्या निवडणुकीचा धुराळा ‘ ह्या ‘ तारखेपासून सुरु

शेअर करा

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकांना दिलेली स्थगिती सहकार खात्याने उठवली आहे. जिल्ह्यातील नगर व पारनेर व वगळता बारा कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकांचा बिगुल वाजला आहे येत्या 23 ऑक्टोबर पासून संचालक मंडळाच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे, असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे

जिल्ह्यातील बारा बाजार समितीच्या संचालक मंडळाची मुदत मागील वर्षी संपली होती मात्र कोरोनामुळे पुढील निवडणूक प्रक्रिया पार पडली नाही. जिल्ह्यातील जामखेड कर्जत संगमनेर राहता राहुरी श्रीरामपूर नेवासा शेवगाव अकोले कोपरगाव पाथर्डी श्रीगोंदा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या विद्यमान संचालक मंडळाला मुदतवाढ मिळाली होती. ही मुदतवाढ 23 ऑक्टोबर रोजी संपुष्टात येत आहे

23 ऑक्टोबर नंतर निवडणुकीची प्रक्रिया सुरू करून न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करण्याचा आदेश सहकार खात्याचे अधिकारी जयंत भोईर यांनी जिल्हा उपनिबंधकांना दिला. जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडून बाजार समितीच्या निवडणुकीची प्रक्रिया हाती घेण्यात येणार आहे. लवकरच बाजार समितीच्या निवडणुकासाठी मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात येतील.

त्यानंतर त्यावर हरकती मागवणे, प्राप्त हरकती वरील सुनावणी घेण्यात येऊन अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जाणार आहे त्यानंतर इच्छुक व्यक्तींकडून नामनिर्देशन पत्र मागवण्यात येणार आहे. संपूर्ण प्रक्रिया पार पाडण्यासाठी सुमारे तीन महिन्यांचा कालावधी लागणार असून त्यामुळे बाजार समित्यांवर सध्या प्रशासक नेमण्याच्या सूचना जिल्हा उपनिबंधकांना देण्यात आलेले आहे.


शेअर करा