मोठी कारवाई ..सेलिब्रिटींची तरुणाई ‘ त्या ‘ जहाजावर काय करणार होती ? शाहरुख खानचा पोरगा धरला

शेअर करा

मुंबईलगतच्या समुद्रात एका मोठ्या जहाजावर (क्रूझ) सुरू असलेल्या हाय प्रोफाइल ड्रग्ज पार्टीवर अमलीपदार्थ नियंत्रण कक्षाने (एनसीबी) शनिवारी रात्री छापा मारला. एनसीबीने १० हून अधिक जणांना ताब्यात घेतले असून त्यामध्ये काही सेलिब्रेटी तसेच त्यांची तरुण मुले यांचा समावेश असल्याचे समजते.कोकेन, चरस, एमडी, गांजा आदी मादक पदार्थ अधिकाऱ्यांनी जप्त केले आहेत. बॉलीवूड अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान यालाही ताब्यात घेण्यात आलं आहे. आर्यन खान याची एनसीबीच्या अधिकाऱ्यांकडून चौकशी सुरू आहे.

उपलब्ध वृत्तानुसार, कॉर्डेलिया या २००० प्रवासी क्षमतेच्या जहाजावर मुंबई-गोवा-मुंबई ट्रिपचे आयोजन करण्यात आले होते. या क्रूझवर उच्चभ्रू वर्गीयांचा प्रामुख्याने समावेश होता. त्यांच्यात ड्रग्ज पार्टी होणार असल्याची माहिती एनसीबीच्या मुंबई पथकाला मिळाली. शनिवारी रात्री गोव्याला जाऊन ते सोमवारी सकाळी परत मुंबईला येणार होते. त्यासाठी आयोजकांनी मोठ्या प्रमाणात ड्रग्ज मागविले होते. एनसीबीच्या पथकाला याबाबत माहिती मिळाल्यानंतर त्यांनी सापळा रचून क्रूझ ग्रीन गेटजवळ थांबले असताना छापा मारण्यात आला .

गुप्तचरसंस्थेला मिळालेल्या एका इनपुटच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. ज्या लोकांना एनसीबीने ताब्यात घेतले आहे, त्यांत एका मोठ्या बॉलिवूड स्टारच्या मुलाचाही समावेश असल्याचे सांगण्यात येत आहे. सदर जहाज शनिवार दुपारी 2 वाजता मुंबईहून रवाना होणार होते आणि 4 ऑक्टोबरला सकाळी 10 वाजता अरबी समुद्रात परत येणार होते.कॉर्डेलिया हे जहाज एका भारतीय कंपनीचे असून यात फॅशन टीव्ही इंडियाचे काही प्रोग्रॅम याआधी झालेले आहेत.

जहाजावर काय काय होणार होत ?

  • पहिल्या दिवशी मियामी येथील डीजे स्टेन कोलेव तसेच डीजे बुल्जआय, ब्राउनकोट आणि दीपेश शर्मा यांचे म्यूजिकल परफॉर्मेंस.
  • दुसऱ्या दिवशी दुपारी 1 ते रात्री 8 वाजेपर्यंत फॅशन टीव्हीने पूल पार्टीचे आयोजन. आयव्हरी कोस्टमधील डीजे राऊलचे भारतीय डीजी कोहरा आणि मोरक्कन कलाकार कायझा परफॉर्म करणार होते.
  • रात्री 8 नंतर पाहुण्यांसाठी शॅम्पेन ऑल-ब्लॅक पार्टी आणि स्पेस मोशन आ
  • उर्वरित कलाकार रात्री 10 ते सकाळी 7 पर्यंत इलेक्ट्रॉनिक संगीत कार्यक्रम
  • तिसऱ्या दिवशी 4 ऑक्टोबरच्या सकाळी 10 वाजता जहाज मुंबईला परतणार होते.

शेअर करा