तीन मुलांची आई विवाहित प्रियकरासाठी झाली ‘ अक्षरश: ‘ पागल, त्यानेही रचला ‘ मास्टरप्लॅन ‘ अन ..

शेअर करा

देशात अनेक धक्कादायक घटना उघडकीस येत असून अशीच एक घटना ठाणे इथे उघडकीस आली आहे . मूळची ठाणे येथील असलेल्या तरुणीची हत्या करण्यात आली आणि तपास सुरु असतानाच एक एक रहस्य उलगडत गेले. सत्य समोर आल्यानंतर पोलीस देखील चक्रावून केले. सदर तरुणीने या तिच्या प्रियकरासाठी अक्षरश: घर विकले, दागिने विकले आणि अखेर त्यानेच तिचा घात केला.

काय आहे प्रकरण ?

उत्तर प्रदेशच्या बहराईच जिल्ह्यात 11 सप्टेंबरला एका 35 वर्षीय महिलेसह तिच्या तीन मुलांचा मृतदेह आढळला होता. महिला स्थानिक नसल्याने मृतदेह नेमके कुणाचे याचा सुरुवातीला काहीच थांगपत्ता लागला नाही मात्र अखेर पोलीस तपासाचे चक्र फिरवतात आणि उत्तर प्रदेशच्या बहराईच जिल्ह्यात घडलेल्या हत्येच्या घटनेला ठाण्याचं कनेक्शन असल्याचं समोर येतं. पोलीस आरोपीला बेड्या ठोकतात आणि सर्व घटना उलगडत जाते.

मृतक 35 वर्षीय महिलेचं नाव मेरी कत्रायन असून ती मुंब्रा इथे एका दुकानात काम करायची. तिच्यासोबत ननूक उर्फ मुबारक अली हा देखील तिथेच काम करायचा. ननूक हा विवाहित असूनही त्याचे मेरीसोबत प्रेमसंबंध होते. मेरीचं वर्षभरापूर्वी तिच्या पतीसोबत भांडण होऊन ती पतीपासून वेगळी राहत होती याचदरम्यान ती ननूक यांच्या संपर्कात आली आणि त्याच्यासोबत लग्न करण्यासाठी अक्षरश: पागल झाली. ननूक याच्यासोबत राहण्यासाठी मेरीने स्वतःचे घर विकले आणि ननूक याला ते पैसे देऊन टाकले.

मेरी ननूककडे वारंवार लग्न करण्याची विनंती करत होती मात्र ननकूचं आधीच एक लग्न झालेलं होतं. त्यामुळे तो मेरीच्या लग्नाच्या मागणीकडे दुर्लक्ष करायचा. पण मेरी हट्टालाच पेटली त्यामुळे ननूक याने मेरीचा कायमचा बंदोबस्त करण्याचं ठरवलं आणि तिला व तिच्या मुलांना उत्तर प्रदेशात बहराईच इथे गोड बोलून घेऊन गेला. तिथे त्याने त्याच्या इतर साथीदारांच्या मदतीने मेरी आणि तिच्या तीनही मुलींची हत्या केली आणि त्यानंतर दुसऱ्याच दिवशी ते लखनऊहून मुंबईच्या दिशेला रवाना झाले.

उत्तर प्रदेश पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरु होता. पोलिसांना जसजसे पुरावे मिळत गेले तसतसे ते आरोपींच्या जवळ येत गेले. अखेर उत्तर प्रदेश पोलिसांचे एक पथकच मुंबईत दाखल झाले. त्यांनी मेरीची माहिती काढली. त्यांनंतर ते ठाण्यातील मुंब्रा इथे गेले. त्यांनी चौकशी करत आरोपी ननूकला ताब्यात घेतलं. त्याला पोलिसी खाक्या दाखवत त्याचा जबाब नोंदवला. यावेळी आरोपीने आपला गुन्हा कबूल केला असून पोलिसांनी त्याच्यासह आणखी दोन जणांना बेड्या ठोकल्या आहेत.


शेअर करा