‘ भाजपच्या खासदार पुत्राने शेतकऱ्यांवर गाडी चढवली ‘, पोस्ट मार्टेममध्ये काय आली माहिती ?

शेअर करा

उत्तर प्रदेशातल्या लखीमपूरमध्ये रविवारी शेतकऱ्यांना भाजपच्या खासदारपुत्राकडून चिरडण्यात आलं त्यानंतर हिंसाचार उफाळला आणि त्यात आणखी चार जणांना आपला जीव गमवावा लागला, ज्यात एका स्थानिक पत्रकाराचाही समावेश आहे. ठार झालेल्यांमध्ये 4 शेतकरी, 2 भाजप कार्यकर्ते, 1 अजय मिश्राचा चालक आणि एक स्थानिक पत्रकार यांचा समावेश आहे. लखीमपूर हिंसाचारात ठार झालेल्या 8 जणांचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट समोर आला असून त्यात मृत्यूची कारणे खालीलप्रमाणे देण्यात आली आहेत .

चार शेतकऱ्यांच्या मृत्यूचा पोस्ट मार्टेम रिपोर्ट

लव्हप्रीत सिंग (शेतकरी) : मृत्यूचे कारण-रोडवर फरफटत नेल्याने मृत्यू, शरीरावर जखमेच्या खुणा, धक्का आणि रक्तस्त्रावाने मृत्यू
गुरविंदर सिंग (शेतकरी) : मृत्यूचे कारण – दोन जखमा आणि स्क्रॅचच्या खुणा आढळल्या. तीक्ष्ण हत्यारं किंवा तीक्ष्ण वस्तूमुळे झालेली दुखापत. धक्का आणि रक्तस्त्राव झाल्याने मृत्यू
दलजीत सिंग (शेतकरी) : मृत्यूचे कारण- शरीराखाली अनेक ठिकाणी फरफटत नेल्याच्या खुणा, गाडीखाली आल्यामुळे जखमांची शक्यता
छत्रसिंग (शेतकरी) : मृत्यूचे कारण- जोरदार धक्का, रक्तस्त्राव आणि मृत्यूपूर्वी कोमात गेले. अंगावर फरफटत नेल्याच्याही खुणाही सापडल्या.

इतर चार जणांच्या मृत्यूचे कारण

शुभम मिश्रा (भाजप नेते) : मृत्यूचे कारण- लाठ्यांकाठ्यांनी मारणे. शरीरावर डझनहून अधिक ठिकाणी जखमा, मारहाणीच्या खुणा आढळल्या.
हरी ओम मिश्रा (अजय मिश्राचा चालक) : मृत्यूचे कारण- लाठ्यांकाठ्यांनी मारणे. शरीरावर अनेक ठिकाणी दुखापतीच्या खुणा आहेत. मृत्यूपूर्वी धक्का आणि रक्तस्त्राव.
श्याम सुंदर (भाजपा कार्यकर्ता) : मृत्यूचे कारण- काठ्यांनी मारहाण. या अपघातात डझनहून अधिक जखमा
रमण कश्यप (स्थानिक पत्रकार) : मृत्यूचे कारण- शरीरावर मारहाणीच्या गंभीर खुणा. धक्का आणि रक्तस्त्रावामुळे मृत्यू.

शवविच्छेदन अहवालानुसार वाहनाखाली चिरडल्याने शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. धडकल्यानंतर खेचल्यामुळे शेतकऱ्यांच्या शरीरावर खोल जखमा आढळून आल्या आहेत तर दुसरीकडे भाजप कार्यकर्ता, ड्रायव्हर आणि पत्रकाराच्या शरीरावर जखमेच्या खुणा आढळल्या आहेत. सोमवारी प्रशासन आणि शेतकरी यांच्यात एक करार झाला असून हिंसाचारात मारल्या गेलेल्या चार शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना 45-45 लाख रुपयांची भरपाई आणि कुटुंबातील एका सदस्याला नोकरी देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे तसेच हिंसाचारात जखमी झालेल्यांना 10 लाख रुपयांची भरपाई दिली जाईल.


शेअर करा