पोलीस तपासणीसाठी तिला दवाखान्यात घेऊन गेले अन.. , नगरमधील प्रकार

शेअर करा

अल्पवयीन मुलीचे लग्न लावून दिल्याप्रकरणी नगर येथील कोतवाली पोलिस ठाण्यात मुलीची आई, पती व सासरच्या व्यक्तींच्या विरोधात अत्याचार, पॉक्सो, बालविवाह प्रतिबंधक कलमान्वये गुन्हा दाखल झाला आहे. पीडित अल्पवयीन मुलीला जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी आणले असताना तिच्यासह तिच्या बालिकेचे अपहरण झाले ,या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नगर शहरात राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीचा लग्नाला विरोध असताना आईने नात्यातील एका तरुणाशी तिचे बळजबरीने लग्न लावून दिले. पतीने वेळी शारीरिक संबंध ठेवल्यामुळे त्यातून ती गर्भवती राहिली आणि तिने एका बालिकेला जन्म दिला. पुढे जुगाराचा नाद लागल्याने पती जुगारात कंगाल झाला आणि घरी येऊन त्याने त्रास द्यायला सुरु केले. त्यानंतर पीडित मुलगी ही या त्रासाला कंटाळून आईकडे राहण्यास आली. पीडित मुलीने चाईल्ड लाईनची मदत घेत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.

कोतवाली पोलीस ठाण्याचे कर्मचारी या मुलीला आणि तिच्या पालिकेला घेऊन जिल्हा रुग्णालयात तपासणीसाठी आले असताना तिथूनच तिच्यासह तिच्या मुलीचे देखील अपहरण करण्यात आले. कोतवाली महिला पोलिसांनी दिलेल्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक समाधान सोळुंके हे पुढील तपास करत असून मुलीच्या तपासासाठी पथके रवाना झालेली आहे


शेअर करा