चोवीस वर्षाच्या भोंदू बाबाचा लागला ‘ रॉंग नंबर ‘ , समोरची महिला कोण समजलेच नाही अन ..

शेअर करा

महाराष्ट्रात अनेक धक्कादायक घटना असताना अंधश्रद्धेच्या जोरावर महिलेचे शारिरीक शोषण केल्याची घटना समोर आली आहे. अमरावती येथील या घटनेत जर ‘ तुला बाळ हवे असेल तर सव्वा महिन्याचे उपवास कर ‘ अशी बतावणी करत अंगावरून कापूर उतरवणार्‍या एका भोंदूबाबाचा अंधश्रद्धा निर्मूलन समितीने भांडाफोड केला आहे . विशेष म्हणजे ही महिला अंधश्रद्धा निर्मूलन समितीची कार्यकर्ती होती ही बाब या बाबाच्या ध्यानीच आली नाही.

सदर महिला रुग्ण म्हणून या बाबाच्या दरबारात पोचली होती त्यानंतर बाबाने तिला ‘ तुला बाळ हवे असेल तर सव्वा महिन्याचे उपवास कर ‘ असा सल्ला देत तिचे शोषण करण्यास सुरुवात केली होती, त्यानंतर या कार्यकर्तीच्या तक्रारीवरून फ्रेझरपुरा पोलिसात अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्यावतीने गुन्हा दाखल करण्यात आला आणि या भोंदू बाबाला अटक करण्यात आली.

अल्पेश गुणवंतराव पाटील असे या भोंदू बाबाचे नाव असून त्याचे वय फक्त 24 वर्ष असल्याचे समजते. अल्पेश पाटील हा दरबार भरवायचा आणि त्याच्या दरबारात गेलेल्या महिलांना मुल होत असल्याचा दावा देखील तो करत होता. या संदर्भातल्या अनेक तक्रारी अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडे आल्या होत्या. यानंतर समितीकडून हा सापळा रचण्यात आला त्याला जेरबंद करण्यात आले. फ्रेझरपुरा पोलीस ठाण्याचे निरीक्षक नितीन मगर यांच्या म्हणण्यानुसार आरोपीला तपासादरम्यान रात्री उशिरा अटक करण्यात आली आहे.


शेअर करा