अडगळीत सापडलेला मोबाईल नोकराने दुरुस्त करून घेतला आणि सुरु झाला ‘ मोठा खेळ ‘

शेअर करा

घराची साफसफाई करताना सापडलेल्या जुन्या मोबाईलमधील आक्षेपार्ह फोटो वापरून मालकाला ब्लॅकमेल करण्याची धक्कादायक घटना मध्य प्रदेशात समोर आली आहे. घरात साफसफाईसाठी येणाऱ्या नोकराला खराब झाल्यामुळे अडगळीत फेकून दिलेला एक मोबाईल सापडला. तो मोबाईल त्याने दुरुस्त करून घेतला आणि त्यात त्याला घऱमालक तरुण आणि त्याच्या होणाऱ्या पत्नीचे आक्षेपार्ह अवस्थेतील काही फोटो सापडले. हे फोटो व्हायरल करण्याची धमकी देत त्याने या तरुणाकडे 1 लाख रुपयांची मागणी केली आणि प्रकरण पोलिसात पोहचले.

उपलब्ध वृत्तानुसार, भोपाळमधील एका तरुणाच्या घरी शाहरूख खान नावाचा नोकर साफसफाईसाठी येत होता. एक दिवस त्याला खराब झालेला मोबाईल सापडला. त्याने तो मोबाईल तसाच खिशात टाकला आणि तो दुरुस्त केल्यावर त्यात त्याला या मालकाचे आणि त्याच्या होण्याच्या पत्नीचे काही आक्षेपार्ह फोटो आढळून आले. या फोटोंचा वापर करून ब्लॅकमेल करून पैसे उकळण्याचा डाव आखला आणि एका वेगळ्या नम्बरवरून तरुणाला संपर्क साधत ते फोटो व्हाट्सएप्पवर पाठवले आणि फोटो व्हायरल न कऱण्याच्या मोबदल्यात त्याने 1 लाख रुपयांची मागणी केली.

मालकही देखील हट्टाला पेटला आणि काय करायचे ते कर , असे म्हटल्यानंतर या शाहरुखने वेगवेगळ्या 5 बनावट फेसबूक अकाऊंटच्या माध्यमातून हे फोटो व्हायरल केले. तरुणाने दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी शाहरूख खानला अटक केली असून पोलिसांनी त्याच्याकडून एक मोबाईल फोन जप्त केला असून काही सिमकार्डदेखील जप्त केले आहेत .स्वतःची आणि स्वतःच्या होणाऱ्या पत्नीची बदनामी टाळण्यासाठी हा तरूण आपल्याला 1 लाख रुपये देईल, असा आपला अंदाज असल्याचं शाहरूख खाननं पोलिसांना सांगितलं मात्र आपल्याला पैसे न दिल्यामुळे आपण ते फोटो व्हायरल केल्याची कबुली त्याने दिली आहे.


शेअर करा