महाराष्ट्र हादरला..चालत्या ट्रेनमध्ये पतीला मारहाण करत विवाहितेवर सामूहिक बलात्कार

शेअर करा

माणुसकीला काळिंबा फासणारी एक घटना लखनौहून मुंबईकडे येणाऱ्या पुष्पक एक्सप्रेसमध्ये इगतपुरी रेल्वे स्थानका दरम्यान ही घडली आहे. आधी रेल्वेत अनेक प्रवाशांची लूट केली आणि त्यानंतर पतीसोबत प्रवास करणाऱ्या महिलेला धमकावून तिच्यावर अत्याचार करण्यात आले. इगतपुरी ते कसारा दरम्यान लखनऊ-मुंबई पुष्पक एक्सप्रेसमध्ये ही घटना घडली असून कल्याण जीआरपी पोलिसांनी याप्रकरणी तीन दरोडेखोरांना ताब्यात घेतले असून इतर आरोपींचा शोध सुरु असल्याचे समजते.

शुक्रवारी संध्याकाळी सहाच्या सुमारास पुष्पक एक्सप्रेस इगतपुरी स्टेशनला पोहोचली. इगतपुरी स्थानकातून ट्रेन मुंबईच्या दिशेने येत असताना बोगद्याजवळ ट्रेन स्लो असल्याने सात ते आठ जण ट्रेनमध्ये चढले. त्यांनी प्रवाशांना मारहाण करण्यास सुरुवात केली. हे सर्व दरोडेखोर प्रवाशांकडून मोबाईल आणि पैसे हिसकावून घेत होते . दरोडेखोरांच्या हातात फाइटर आणि बेल्ट होता त्याने मारहाण करत त्यांनी अनेक प्रवाशांना लुटले.

काही वेळानंतर दरोडेखोरांनी प्रवाशी महिलासोबत छेडछाड सुरू केली आणि एका वीस वर्षीय महिलेवर बलात्कार करण्यात आला. पीडित महिलेच्या नवऱ्याला लोखंडी राँडने मारहाण करून पतीच्या समोरच पत्नीला चाकूचा धाक दाखवून महिलेवर अत्याचार करण्यात आले. पुष्पक एक्सप्रेसच्या डी ०२ बोगीमध्ये ही घटना घडली आहे. आरोपींनी तब्बल ९६ हजारांची लूट केली आहे. कल्याण जीआरपी आणि कल्याण रेल्वे क्राईम ब्रांच या प्रकरणाचा तपास करीत आहे .

वाचा आरोपींची नावे

  • प्रकाश पारधी २० (त्र्यंबकर रोड, इगतपुरी)
  • अर्षद शेख १९ (मालडचा राहणारा)
  • अक्कू (घोटी नाशिक)
  • पव्या (घोटी नाशिक)
  • काल्या (घोटी नाशिक)
  • गुड्या (टाकेत गाव)
  • राहुल (टाकेत गाव)
  • कळश्या (घोटी नाशिक)

शेअर करा