लिंगपिसाट सावत्र बापाच्या छेडछाडीला वैतागून मुलीने केले ‘ असे काही ‘ ? : महाराष्ट्रातील घटना

शेअर करा

एकदा माणसाच्या डोक्यात विकृती शिरली की काय घडेल याचा नेम नाही. ती आपल्या चार महिन्याच्या बाळाला घेऊन माहेरी आली होती मात्र तिच्या सावत्र बापाची तिच्यावर वाईट नजर पडली. ती घरी एकटी असताना सावत्र बाप तिची छेड काढत होता मात्र तिचा संयमाचा बाण सुटला आणि झालेल्या झटापटीत तिने सावत्र बापाचा खून केला.नाशिक येथील नाशिकरोड परिसरात ही घटना घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मुलीने आकाश शिंदे नावाच्या तरुणासोबत प्रेमविवाह केला होता.त्यानंतर त्यांना 26 मार्च रोजी मुलगा देखील झाला. लॉकडाउनच्या काळात हे जोडपे नाशिकमध्ये चार महिन्यापूर्वी सावत्र बापाच्या घरी राहण्यासाठी आले होते. सुभाष चिंतामण बोराडे असे ह्या मयत सावत्र बापाचे नाव आहे.

मंगळवारी संध्याकाळी मुलगी आपल्या चार महिन्याच्या बाळासह घरी एकटीच होती. त्यावेळी सावत्र बाप असलेल्या सुभाष बोराडेने मुलीची छेड काढली आणि तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर दोघांमध्ये झटापट झाली. या झटापटीत पित्याला दुखापत झाली आणि तो खाली कोसळला. त्यानंतर मुलीने बापाच्या गळ्यावर जोरात पाय दिला त्यामुळे श्वास कोंडल्यामुळे जागेवरच मृत्यू झाला, असे मुलीचे म्हणणे आहे .

ही घटना घडल्यानंतर पीडित आरोपी तरुणीने आपल्या पतीला फोन केला आणि स्वत: आपल्या पतीसह पोलीस स्टेशनमध्ये हजर झाली आणि वडिलांचा खून केल्याची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवला आहे. सुभाष चिंतामण बोराडे असं खून झालेल्या पित्याचे नाव आहे. यासंदर्भात अधिक चौकशी सुरु असून न्यायालयात हजर केले असता तिला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.


शेअर करा