नागपूर हादरले..मैत्रिणीवर बलात्कार करण्यासाठी त्याने तब्बल ‘ इतक्या ‘ जणांना बोलावले अन..

शेअर करा

महाराष्ट्रात रोज धक्कादायक घटना उघडकीस येत असतानाच अशीच एक धक्कादायक घटना नागपूर इथे उघडकीस आली आहे . 17 वर्षीय अल्पवयीन मुलीवर सात आरोपींनी बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली असून नागपूरच्या एमआयडीसी पोलिस ठाण्यांतर्गत इसासनी भागात ही घटना घडली असून याप्रकरणी पोलिसांनी चार आरोपींना अटक केली आहे तर या मुलीवर बलात्कार करणारे इतर तीन आरोपी मात्र अद्याप फरार आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलीचा मित्र तिला सोबत घेऊन तीन दिवसांपासून देह व्यापार करत होता. गुरुवारी देखील तो तिला ग्राहकांकडे घेऊन गेला होता. पिडीत मुलगी तिथे पोहचली असताना सात आरोपी त्याठिकाणी आले. त्यांनी मुलीच्या मित्राला मारहाण करून मुलीवर बळजबरीने सामूहिक बलात्कार केला. यावेळी पीडितेने प्रतिकार केला असता तिला आणि तिच्या मित्राला मारहाण करण्यात आली. यावेळी झालेल्या भांडणाच्या आवाजाने परिसरातील इतर नागरिकांना या प्रकाराची माहिती समजली आणि प्रकरण पोलिसांपर्यंत गेले.

पोलिस घटनास्थळी दाखल झाल्यावर पीडितेने स्वतःची आपबीती सांगितली आणि त्यावरून पोलिसांनी सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल होताच मुलीच्या मित्रासह चार आरोपींना अटक केली आहे. पोलिस अद्याप तीन आरोपींचा शोध घेत आहेत. तसेच पुढील तपास एमआयडीसी पोलिस करत असल्याचे अतिरिक्त पोलिस आयुक्त नविनचंद्र रेड्डी यांनी सांगितले.


शेअर करा