‘ सर्व काही मज्जेसाठी ‘, तब्बल ५० मुली आणि शिक्षिकांचे आयुष्य केले उध्वस्त , वय अवघे एकोणीस

देशात एक धक्कादायक घटना समोर आली असून व्हाट्सअँपवर अश्लील मेसेज आणि सोशल मीडियावर मॉर्फ्ड केलेले फोटो पाठवल्याप्रकरणी उत्तर दिल्ली येथील एका प्रकरणात आरोपीला पटना बिहार येथून जेरबंद केले आहे . महावीर कुमार असे या आरोपीचे नाव असून आपण सर्व हे मज्जेसाठी करत होतो, अशी धक्कादायक कबुली देखील त्याने दिली आहे . ऑनलाईन क्लासमध्ये एडमिनच्या परवानगीशिवाय तो प्रवेश करायचा आणि त्यानंतर इतर मुलींचे आणि शिक्षिकांचे नंबर हातात आल्यावर हा असले उद्योग करत होता..

काय आहे प्रकरण ?

सदर प्रकरणाबद्दल २ महिन्यापूर्वी ८ ऑगस्टला दिल्ली पोलिसांकडे एक तक्रार आली होती.उत्तर दिल्लीच्या एका शाळेतील मुलींना आणि शिक्षकांना हा त्रास देत होता. सायबर सेलकडून तपास सुरु असतानाच यामागे १९ वर्षीय मुलाचा हात असल्याचं उघड झालं. आरोपी हा महावीर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी खडगपूर येथे पदवीचं शिक्षण घेत होता.आतापर्यंत त्याने ५० पेक्षा जास्त शिक्षिका आणि मुलींना निशाणा बनवल्याची माहिती पुढे आली आहे .

शाळेत शिकणाऱ्या मुलीसोबत महावीरचा आधी ऑनलाईन संपर्क झाला. महावीर त्या मुलीला खूप पसंत करत होता. त्यानंतर महावीरनं इन्स्टावरुन फेक आयडी बनवत त्या मुलीशी संपर्क साधला. त्या मुलीला अश्लील फोटो पाठवून ब्लॅकमेल करू लागला. त्याने त्या मुलीकडून शिक्षकांचे नंबर्स घेतले आणि ऑनलाईन क्लासमध्ये अश्लील वेबलिंक्स शेअर करू लागला. पोलीस तपास सुरु झाल्यावर काही दिवसातच त्याला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘ महावीरनं ओळख लपवण्यासाठी कॉलवर आवाज बदलणाऱ्या एप्सचा वापर केला आणि वेगवेगळ्या एप्सच्या माध्यमातून पीडितांचे फोटो न्यूड करत मॉर्फ केले होते. महावीरनं कुठल्याही प्रकारची वसुली केली नाही. हे सर्व काही मज्जेसाठी केल्याचा दावा महावीरनं केला. महावीरचा सोशल मीडिया चेक केला तर त्याने युजर्सचा फोन नंबर जाणून घेण्यासाठी अनेकदा ब्लॅकमेलिंगचा वापर केल्याचे उघडकीस आले आहे मात्र कुठल्याही प्रकारे आर्थिक व्यवहार झाला नाही. मला एक मुलगी आवडत होती. परंतु त्यानंतर त्याने आणखी मुलींचा शोध घेण्यासाठी इन्स्टाग्रामवर फेक आयडी बनवण्यास सुरुवात केली होती मात्र कारवाई झाल्याने त्याला बेड्या पडल्या आहेत ‘