महाराष्ट्र हादरला..’ जाऊ का तुझ्या पतीकडे ? ‘, पीडित विवाहितेने निवडला ‘ असा ‘ पर्याय की ..

महाराष्ट्रात अनेक धक्कादायक घटना उघडकीस येत असल्याने राज्यात काय चाललंय हे कळायला मार्ग नाही. मुंबईतील आणि नागपूर येथील सामूहिक बलात्कार प्रकरण ताजे असतानाच यवतमाळ येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे . एका तरुणाने एका विवाहित महिलेला गुंगीचे औषध पाजून तिचे नग्न फोटो काढले आणि ते फोटो पतीला दाखवण्याची धमकी देत वारंवार तिच्यावर अत्याचार केले. अवधूतवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घटना घडलेली असून पोलीस ठाण्यात आरोपी विशाल शेंडे याच्याविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

उपलब्ध वृत्तानुसार, ‘ एका ३३ वर्षीय महिलेसोबत २०११ मध्ये विशाल शेंडे याची ओळख झाली होती. त्यानंतर सन २०१३ मध्ये विशालने विवाहित महिलेला घरी बोलवले आणि चहामध्ये गुंगीचं औषध पाजलं. त्यानंतर ती बेशुद्ध झाली आणि आरोपीने या विवाहित महिलेचे नग्न फोटो काढले. त्यानंतर एके दिवशी विशाल याने त्या विवाहितेला फोन करत तिला घरी भेटायला बोलावले. ‘ आता घरी कशाला भेटायला येऊ ‘ म्हणून त्या महिलेने विचारले असत त्याने विवाहितेला ‘ तुझे नग्न फोटो माझ्याजवळ आहेत आता आली नाहीस तर हे फोटो तुझ्या नवऱ्याला दाखवतो ‘, अशी धमकी दिली

त्याच्या या धमकीने महिला घाबरून गेली आणि भीतीपोटी त्याच्या घरी गेली असताना त्याने तिच्यावर अत्याचार केला. अत्याचार करतेवेळी विशालच्या मोबाईलमध्ये विवाहितेने फोटो बघितले असता, ते फोटो २०१३ मध्ये विशालने गुंगीचे औषध पाजून काढले असावे, याचा अंदाज या महिलेला आला मात्र त्यानंतरही २०२० पर्यंत विशाल वारंवार त्या विवाहितेला तुझ्या पतीला फोटो दाखवतो, अशी धमकी देत तिच्यावर अत्याचार करत होता. अखेर त्याचा त्रास असह्य झाल्याने रविवारी पीडित महिलेने थेट अवधूतवाडी पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली असून प्रकरणाचा पुढील तपास ठाणेदार मनोज केदारे यांच्या मार्गदर्शनात सुरु असल्याचे समजते.