नगर ब्रेकिंग..ओरिजनल पोलिसांच्या समोरच चक्क डुप्लिकेट पोलीस म्हणून दरोडेखोर आले अन..

पोलीस असल्याचे भासवण्यासाठी चक्क महाराष्ट्र पोलीस असे नाव असलेले जॅकेट अंगात घालून हातात वॉकीटॉकी घेऊन दरोड्याच्या तयारीत असताना पोलिसांनी छापा टाकून नगर शहरात पाच जणांची टोळी गजाआड केली आहे. तोफखाना पोलिसांनी शुक्रवारी रात्री शहरातील माळीवाडा परिसरात ही कामगिरी केली आहे.

प्रवीण संजय गंगावणे ( वय 25 राहणार गुरव पिंपरी तालुका कर्जत) मुकेश शंकर सावंत ( वय 34 राहणार सांगवी आष्टी ), सुनील ललित थापा ( वय 57 राहणार मुंबई ) सुनील कैलास खरमाटे ( वय 35 पिंपळगाव टप्पा तालुका पाथर्डी) व शंकर हिरामण शिरसाट( वय 22 राहणार पिंपळगाव टप्पा ) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलीस निरीक्षक संपत शिंदे हे शुक्रवारी संध्याकाळी नगर शहरात पेट्रोलिंग करत असताना त्यांना या टोळी बाबत माहिती मिळाली होती. गुप्त सूत्रांच्या आधारावरून तपास सुरू असतानाच आरोपी हे एका कारमधून माळीवाडा परिसरात दाखल झाले होते. एका आरोपीच्या अंगात पोलिस असे नाव लिहिलेले जॅकेट आणि हातात वॉकी-टॉकी देखील होती. पोलिसांशी सामना होताच पोलिसांनी तात्काळ पाचही जणांना ताब्यात घेतले आणि आरोपींकडून एक कार, एक मोटर सायकल, मोबाईल, गावठी कट्टा, तीन काडतुसे, लाकडी दांडके, एक तलवार, मिरची पावडर, लोखंडी कटावणी असा दरोड्यासाठी गरजेचा असलेला मुद्देमाल जप्त केला आहे.

सदर टोळीतील म्होरक्या मुकेश सावंत याच्या विरोधात औरंगाबाद जिल्ह्यात विविध पोलीस ठाण्यात अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक संपत शिंदे, उपनिरीक्षक मनोज कचरे पोलीस नाईक योगेश भिंगारदिवे, शरद गायकवाड, नितीन शिंदे भारत इंगळे, सागर पालवे यांच्या पथकाने ही कारवाई पूर्ण केली असून परिसरात पोलिसांच्या या कामगिरीचे मोठे कौतुक होत आहे.