पोलीस दलातील पतीची अनैतिक संबधातून हत्या करणाऱ्या पत्नीबद्दल न्यायालय म्हणाले..

अनैतिक संबंधातील अडसर दूर करण्यासाठी पतीचा अमानुषपणे खून करणारी पत्नी आणि तिच्या प्रियकरासह एकूण चार आरोपींची जन्मठेप व इतर शिक्षा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने कायम ठेवली आहे. न्यायमूर्ती विनय देशपांडे व अमित बोरकर यांनी हा निर्णय दिलेला असून त्यांच्या या निर्णयाचे स्वागत नागरिकांकडून स्वागत केले जात आहे.

आरोपींमध्ये मोनिका मनोज भाबट ( राहणार नागपूर ), महिलेचा प्रियकर प्रमोद माधव रांनावरे (वडगाव जिल्हा यवतमाळ ) , नितीन मधुकर घाडगे ( वडगाव जिल्हा यवतमाळ) व आशिष रामदास काळे ( काळगाव जिल्हा यवतमाळ ) यांचा समावेश आहे.

केंद्रीय राखीव पोलीस दलात कार्यरत असलेले मनोज भाबट यांच्याशी 2000 साली मोनिकाचे लग्न झाले होते. त्यानंतर काही वर्षात त्यांना एक गोंडस मुलगा देखील झाला. मनोज हे कर्तव्यावर असताना पत्नी मोनिका यवतमाळ येथे एकटीच राहत होती, याच दरम्यान मोनिका हिचा आरोपी प्रमोद याच्यावर जीव जडला. ही गोष्ट पतीच्या लक्षात आली आणि पती प्रमोद व पत्नी मोनिका यांच्यात भांडणे होऊ लागली.

सातत्याने भांडणे होत असल्याने आपल्या प्रेमप्रकरणात पतीचा अडसर होतो आहे हे मोनिकाच्या लक्षात आले आणि आणि तिने आपल्या प्रियकराला सोबत घेऊन पतीच्या हत्येचा कट रचला. पती मनोजचा कायमचा अडसर दूर करण्यासाठी मोनिका व प्रमोद यांनी इतर दोन आरोपींच्या मदतीने दिनांक 1 ऑक्टोबर 2013 रोजी चाकूने भोसकून मनोजचा खून केला. खून झाल्यानंतर काही दिवसातच मोनिका व तिच्या साथीदारांना अटक करण्यात आली होती त्यावर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात सुनावणी होती त्यावेळी हा निर्णय देण्यात आला .