‘ मानलेल्या भावासोबत ‘ पत्नीने केल्या सर्व मर्यादा पार , वारंवार सांगूनही ..

शेअर करा

महाराष्ट्रात रोज धक्कादायक घटना उघडकीस येत असून अशीच एक घटना भिवंडी येथे उघडकीस आली आहे. पत्नीने आपल्या साथीदाराच्या मदतीने पतीची गळा आवळून हत्या केली. रविवारी ही घटना भिवंडी येथे उघडकीस आली असून या प्रकरणी निजामपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे . आरोपी पत्नीला पोलिसांनी अटक केली असून तिचा साथीदार मात्र फरार असल्याचे समजते.

उपलब्ध वृत्तानुसार संजय पागी ( वय 38 ) असे हत्या झालेल्या पतीचे नाव आहे. सविता संजय पागी ( वय 35 ) व वडपा येथे राहणारा अक्षय हरिश्‍चंद्र काळण असे हत्या करणाऱ्या आरोपींची नावे आहेत. अक्षय हा सविता हीचा मानलेला भाऊ असून त्यावरून सातत्याने या पती-पत्नीत भांडणे होत होती. पती संजय हा त्यांच्यावर सातत्याने संशय घेत होता.पतीने अक्षयला घरी येण्यास मनाई केली होती मात्र तरीदेखील संजय घरी नसताना अक्षय याचे संजयच्या घरी बिनधास्त नेहमी येणे जाणे सुरू होते.

सतत बायकोला आणि त्याला सांगून देखील अक्षयच्या वर्तनात बदल होत नसल्याने पती संजय व सविता यांच्यात सातत्याने भांडणे होत होती. आपल्यामुळे पती-पत्नीत भांडणे होतात हे लक्षात आल्यानंतर अक्षय याने सविता हिला आपल्या पतीला मारण्याचा सल्ला दिला आणि सविताने अक्षय याच्या मदतीने आपला पती संजय याची गळा आवळून हत्या केली. याप्रकरणी निजामपूर पोलिस ठाण्यात सविता व अक्षय यांच्याविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पत्नी सविता हिला अटक करण्यात आली असून तिचा कथित भाऊ अक्षय हा फरार झाला आहे .


शेअर करा