..अखेर ‘ त्या ‘ गोंडस मुलाची संपूर्ण स्टोरी आली बाहेर , वाचा संपूर्ण बातमी

देशात अनेक धक्कादायक घटना समोर येत असून अशीच एक बातमी गुजरात राज्यातील अहमदाबाद येथून समोर आली आहे . गुजरातच्या गांधीनगर येथे गौशाळेबाहेर सापडलेल्या मुलाबाबत धक्कादायक खुलासा समोर आला असून सोडणारा व्यक्ती हा त्याचा बाप असल्याचे समोर आले आहे . मुलाचे वय हे अवघे १० महिने असून ८ ऑक्टोबरच्या रात्री एक व्यक्ती चिमुरड्याला घेऊन इथं आला आणि त्याने गौशाळेच्या गेटबाहेर त्याला सोडून देत तेथून पळ काढला.

काही वेळांनी गौशाळेचे कर्मचारी गेटजवळ पोहचले त्यांनी लहान मुलाच्या रडण्याचा आवाज ऐकला आणि त्यांनी मुलाला उचलून गौशाळेत घेऊन गेले. त्यानंतर कर्मचाऱ्यांनी त्याच्या आई वडिलांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला मात्र त्यात काही यश आले नाही. दरम्यान ही बातमी स्थानिक नगरसेविका दिप्ती पटेल यांच्याकडे पोहचली आणि रात्री दिप्ती पटेल यांनी या लहान मुलाची काळजी घेतली. सकाळ होईपर्यंत या मुलाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि त्याला सोडणारा व्यक्ती कोण याचा शोध सुरु झाला. .

गौशाळेजवळील सीसीटीव्हीचा शोध घेतला असताना १५० सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर अखेर पोलिसांना यश आलं. एक व्यक्ती सेट्रो कारमधून गौशाळेला आला होता आणि त्याने या मुलाला तिथे सोडून पळ काढला होता. त्या व्यक्तीचे नाव सचिन दीक्षित असे समोर आले मात्र पोलिसांनी सचिन दीक्षितच्या घराचा मागोवा घेतला तेव्हा घराला कुलूप आढळून आले मात्र त्याचा मोबाईल नंबर पोलिसांना मिळून आला .

मोबाईलच्या आधारे तपास सुरु असताना लोकेशन ट्रेस केले तर तो राजस्थानच्या कोटा येथे असल्याचं समजलं. पोलिसांनी फोन केला तेव्हा सचिनने फोनवरच तो मुलगा माझाच असल्याचं कबूल केले आणि त्याचे नाव शिवांश असे आहे हे देखील सांगितले. राजस्थान पोलिसांनी कारवाई करत सचिन याला ताब्यात घेतले तेव्हा तो पत्नी आणि त्याच्या ४ वर्षाच्या मुलासह सेट्रो कारने उत्तर प्रदेशात चालला होता. पत्नीसमोर सचिन काहीच बोलत नव्हता ते पाहून त्याला पोलिसांनी दुसरीकडे नेले तेव्हा त्याने पापाचा पाढा वाचायला सुरुवात केली.

गुजरातच्या गांधीनगरमध्ये सचिन एका कंपनीत कामाला होता. ४ वर्षापूर्वी त्याने घरच्यांच्या सांगण्यावरुन अनुराधासोबत लग्न केले आणि आता त्याला ४ वर्षाचा मुलगा आहे. मात्र पहिले लग्न झालेले असताना २०१८ मध्ये सचिनची भेट हिना नावाच्या मुलीसोबत झाली त्यानंतर दोघंही एकाच फ्लॅटवर भाड्याने राहत होते. सचिन आठवड्याचे ५ दिवस वडोदरा इथं हिनासोबत राहायचा तर २ दिवस अहमदाबादमध्ये कुटुंबाला भेटायला यायचा. दरम्यान दोघांमध्ये शारीरिक संबंध देखील सुरु झाले आणि डिसेंबर २०२० मध्ये हिनाने एका मुलाला जन्म दिला. एक मुलगा होऊनही सचिन तिला लग्नासाठी टाळाटाळ करत होता आणि हिना लग्नासाठी हिना सचिनवर बाव टाकत होती.

८ ऑक्टोबरला सचिन आणि हिना यांच्यात जोरदार भांडण झालं आणि याचदरम्यान रागाच्या भरात सचिनने हिनाचा गळा आवळून खून केला. हिनाच्या मृत्यूनंतर त्याने घरातील एका सुटकेसमध्ये तिचा मृतदेह ठेवला आणि अवघ्या १० महिन्याच्या शिवांशला घेऊन गांधीनगरला जाऊन गौशाळेबाहेर गेटवर सोडून दिले आणि तिथून पळ काढला. हिना भोपाळची रहिवाशी होती तर सचिनच्या कुटुंबाला हिना आणि शिवांशबाबत काहीच माहिती नसल्याचं देखील समोर आले आहे.