मास्टरप्लॅन फेल झाल्यावर सरकारी अधिकाऱ्यासाठी ‘ खास चिठ्ठी ‘ लिहून चोरटे पसार..

देशात अनेक वेगवेगळ्या घटना उघडकीस येत असताना एक चमत्कारीक घटना मध्य प्रदेशात उघडकीस आली असून चोरीच्या उद्देशाने मोठी रिस्क घेत चोरटयांनी घर फोडून घरात प्रवेश मिळवला मात्र घरात घेतल्यानंतरही हाती बरीच रक्कम न आल्याने चोरांनी सदर अधिकाऱ्यासाठी एक चिठ्ठी लिहून ठेवली आणि त्यात ‘ पैसे नसताना घराला कुलूप का लावले ‘ असा मजकूर लिहित तिथून पळ काढला.

उपलब्ध वृत्तानुसार, ज्या घरात चोरांनी प्रवेश मिळवला होता ते एका सरकारी अधिकाऱ्यांचे घर होते. देवास जिल्ह्यात ही घटना उघडकीस आली आहे..सरकारी अधिकाऱ्याच्या घरी चोरटे गेले आणि त्यांना तिथे ना जास्त पैसे मिळाले ना सोने , मग त्यांनी वरील प्रश्न विचारणारी चिठ्ठी लिहून ठेवली असे पोलिसांच्या वतीने सांगण्यात आले आहे. ‘ जब घर मे पैसे नही थे तो लॉक नही करना था कलेक्टर ‘ असे लिहून चोरटे फरार झाले. अधीकारी हे कलेक्टर नाहीत याची देखील या चोरट्यांना माहिती नव्हती .

कोतवाली पोलीस ठाण्याचे प्रभारी उमराव सिंह म्हणाले की, सरकारी अधिकारी त्रिलोचन सिंह गौरव यांच्या घरातून रोख तीस हजार रुपये व काही दागिने चोरीस गेले आहेत. सध्या गौरव देवास जिल्ह्यातील खाते गावात उपविभागीय दंडाधिकारी आहेत. गौरव यांना चोरीबद्दल समजल्यानंतर ते शनिवारी रात्री घरी आले. जवळपास दोन आठवडे ते घरी नव्हते, विशेष म्हणजे वरिष्ठ जिल्हा पोलीस अधिकारी गौरव यांच्या अधिकृत निवासस्थानाच्या जवळच राहायला आहे आहेत. चोरट्याच्या या अनोख्या कारनाम्याची परिसरात चांगलीच चर्चा रंगली आहे.